श्रेया बुगडेच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का ? जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 07:00 IST2022-02-17T07:00:00+5:302022-02-17T07:00:02+5:30

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात.

Did you see the photo of marathi actress Shreya Bugde's family? | श्रेया बुगडेच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का ? जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात

श्रेया बुगडेच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का ? जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री श्रेया बुगडेच (Shreya Bugade)च्या कुटुंबाविषयी  सांगणार आहोत..

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. श्रेया अनेकवेळा पती आणि  कुटुंबासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. श्रेयाच्या कुटुंबात तिचे आई-वडील आणि मोठी बहीण देखील आहे. 

श्रेया बुगडेची मोठी बहीण तेजल ही देखील दिसायला तिच्या इतकीच सुंदर आहे.श्रेया आणि तेजलची चेहरेपट्टी अगदी सारखी असून त्यांच्या केवळ उंचीत फरक असल्याचे दिसून येते.श्रेया बहीण तेजलसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. या फोटोंमधून दोघींमधले बॉन्डिंग ही दिसून येते.  

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. 

Web Title: Did you see the photo of marathi actress Shreya Bugde's family?