श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:02 IST2022-08-18T13:01:36+5:302022-08-18T13:02:23+5:30
Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने कृष्ण जन्माष्टमी निमित्त हटके फोटोशूट केले आहे.तिच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. सगळीकडे धामधूम पाहायला मिळत आहेत. कलाकार मंडळींमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिने कृष्ण जन्माष्टमी निमित्त हटके फोटोशूट केले आहे.तिच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये अपूर्वाने श्रीकृष्णचा अवतार धारण केला आहे. या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अपूर्वा नेमळेकर हिने फोटो शेअर करत लिहिले की, भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचे शत्रू त्याला मारण्यासाठी टपून बसलेले होते. परंतु श्रीकृष्णाने मात्र सर्व संकटांवर मात करून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री जन्म घेतला. हाच दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो. जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे.
तिने पुढे लिहिले की, महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो. यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच त्या केशवाचे चरणी प्रार्थना आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशांनी तुमचे जीवन उजळून निघावे, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी बल्लभम.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारून अपूर्वा घराघरात पोहोचली. इतकंच नाही तर ती आज अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत असल्याचं पाहायला मिळतं. अपूर्वाने यापूर्वी अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे.