मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्रीचा मुलगा आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील रॉकी, जाणून घ्या याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:02 IST2022-02-24T18:30:00+5:302022-02-24T19:02:06+5:30

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla ) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.

did you know yeu kashi tashi me nandayla rocky's mother is also marathi actress | मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्रीचा मुलगा आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील रॉकी, जाणून घ्या याबाबत

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्रीचा मुलगा आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील रॉकी, जाणून घ्या याबाबत

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla ) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत दाखवण्यात आलेली एक आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांना भलतीच आवडली. स्वीटू आणि ओमच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा झालेत. मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचं लग्न झालेलं पाहून प्रेक्षक सुखावले होते. आता तर स्वीटू ओमच्या बाळाची आई होणार आहे. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका ‘तु तेव्हा तशी’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. त्रियुग मंत्रीने साकारलेली रॉकीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांच्या पसंती मिळाली.  त्रियुग मंत्रीची ही पहिलीच मराठी मालिका होती  त्याने याआधी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

सीआयडी, संकटमोचन महाबली हनुमान, सम्राट अशोक , महाराणा प्रताप, विघ्नहर्ता गणेश यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये तो झळकला होता. त्रियुगचे आई-वडील दोघेही अभिनेते असून त्याने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आपले करिअर केले आहे.

त्रियुगची आई सुलभा मंत्री यांनी चोरबाजार, टपाल, धुमशान, पूर्ण सत्य, प्रेमासाठी वाट्टेल ते, आधारस्तंभ यासांरख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्या दामिनी, साराभाई व्हर्सेस साराभाई यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये झळकल्या आहेत. त्यांचे काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Web Title: did you know yeu kashi tashi me nandayla rocky's mother is also marathi actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.