किरण गायकवाडने एकाच वेळी केलंय दोन मुलींना डेट? खुलासा करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:41 IST2023-11-06T15:40:41+5:302023-11-06T15:41:48+5:30
Kiran gaikwad: अभिनेता निखिल चव्हाणमुळे किरणचं सत्य समोर आलं.

किरण गायकवाडने एकाच वेळी केलंय दोन मुलींना डेट? खुलासा करत म्हणाला...
'देवमाणूस', 'लागिरं झालं जी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड. उत्तम अभिनयशैली आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर किरणने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. किरणची खासकरुन तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे.त्यामुळेच त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यामध्येच अभिनेता निखिल चव्हाण याने किरणविषयी एक खुलासा केला आहे. त्याच्या या खुलाशामुळे सगळ्यांच्या नजरा किरणकडे वेधल्या गेल्या आहेत.
'लागिरं झालं जी' या मालिकेत किरण आणि निखिल यांनी एकत्र काम केलं होतं. परंतु, त्यांची मैत्री फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे या दोघांना एकमेकांच्या जीवनातील अनेक लहानमोठ्या गोष्टी ठावूक आहेत. अलिकडेच या जोडीने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये एक गेम खेळत असताना निखिलने किरणविषयी मोठा खुलासा केला. किरणने एकाच वेळी दोन मुलींना डेट केलंय असं निखिलने यावेळी सांगितलं.
'असा कोण आहे जो एकाच वेळी दोन जणींना डेट करतो?' असा प्रश्न निखिल आणि किरण यांना विचारण्यात आला होता. यावेळी दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवलं. मात्र, शेवटी किरणने मी दोन जणींना डेट केलंय हे मान्य केलं. "मी देवमाणूस या मालिकेत खूप वेळा असं डेट केलंय", असं मजेशीर उत्तर किरणने दिलं. दरम्यान, किरण आज लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अलिकडेच त्याचा चौक हा सिनेमा रिलीज झाला.