कॉमेडीचे 'धुरंधर'! फुगडी घातली आणि झिम्मा खेळला, FA9LA गाण्यावर निलेश साबळे आणि भाऊ कदमचं जबरदस्त रील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:06 IST2025-12-17T16:06:17+5:302025-12-17T16:06:56+5:30
निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनाही FA9LA गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. डॉक्टर साबळे आणि भाऊने अक्षय खन्नाच्या FA9LA या गाण्यावर मजेशीर रील बनवला आहे.

कॉमेडीचे 'धुरंधर'! फुगडी घातली आणि झिम्मा खेळला, FA9LA गाण्यावर निलेश साबळे आणि भाऊ कदमचं जबरदस्त रील
'धुरंधर' आणि त्यातील गाण्यांनी सगळ्यांनाच वेड लावलं आहे. अक्षय खन्नाचं FA9LA हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील रील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि काही सेलिब्रिटीही 'धुरंधर'मधील FA9LA या गाण्यावर रील व्हिडीओ बनवताना दिसत आहेत.
निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनाही FA9LA गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. डॉक्टर साबळे आणि भाऊने अक्षय खन्नाच्या FA9LA या गाण्यावर मजेशीर रील बनवला आहे. या व्हिडीओत निलेश साबळे अक्षय खन्नासारखी एन्ट्री घेताना दिसत आहे. तर भाऊच्या हातात बंदूक दिसत आहे. नंतर ते दोघेही फुगडी घालताना आणि झिम्मा खेळत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा रील पाहून चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, भाऊ कदम आणि निलेश साबळे यांचं झी मराठीवर कमबॅक होत आहे. चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वात ते दोघेही दिसले नव्हते. मात्र आता नवीन शोमधून ते दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.