'बिग बॉस 17' मध्ये मनोरंजनाचा डबलडोस; 'वीकेंड का वार'मध्ये ढिंच्याक पूजा घेणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 07:58 PM2023-12-14T19:58:02+5:302023-12-14T19:58:19+5:30

‘बिग बॉस’च्या 17 व्या पर्वाचा आगामी 'वीकेंड का वार' हा धमाकेदार असणार आहे.  

Dhinyak Pooja will make an entry in 'Bigg Boss 17' Weekend Ka Vaa | 'बिग बॉस 17' मध्ये मनोरंजनाचा डबलडोस; 'वीकेंड का वार'मध्ये ढिंच्याक पूजा घेणार एन्ट्री

'बिग बॉस 17' मध्ये मनोरंजनाचा डबलडोस; 'वीकेंड का वार'मध्ये ढिंच्याक पूजा घेणार एन्ट्री

बिग बॉस’च्या 17 व्या पर्वाची दिवसेंदिवस लोकप्रियता अधिकाधिक वाढत चालली आहे. बिग बॉस हे नवं पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. निर्माते टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसत आहेत. आगामी 'वीकेंड का वार' हा धमाकेदार असणार आहे.  सलमान खान स्वतः हा विशेष भाग होस्ट करतो. 

'बिग बॉस 17' मधील या आठवड्यातील  'वीकेंड का वार' आणखी मजेशीर असणार आहे.  कारण तीन लोकप्रिय सेलिब्रिटी 'बिग बॉस 17'  येणार आहेत. यामध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्यासह ढिंच्याक पूजाच्या नावाचा समावेश आहे. वीकेंड का वार एपिसोडचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यात सलमान खानने भारती सिंग, हर्ष लिंबाचिया आणि ढिंच्याक पूजासोबत खूप मस्ती केली. दरम्यान या बाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

आतापर्यंत 'बिग बॉस 17'च्या घरातून आतापर्यंत 5 स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे.   तर यावेळी शोमध्ये चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये विकी जैन, अभिषेक कुमार, नील भट्ट आणि खानजादी यांच्या नावांचा समावेश आहे. त्यापैकी एक आगामी 'वीकेंड का वार' मध्ये बिग बॉस 17 मधून बाहेर पडेल. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यंदा बरेच ट्विस्ट बिग बॉसमध्ये ठेवण्यात आले आहेत.
 

Web Title: Dhinyak Pooja will make an entry in 'Bigg Boss 17' Weekend Ka Vaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.