युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्रीची पोस्ट, म्हणते- "देवाच्या कृपेने मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:25 IST2025-02-26T18:24:39+5:302025-02-26T18:25:21+5:30
युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्रीची पोस्ट, म्हणते- "देवाच्या कृपेने मी..."
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोट घेत वेगळे होणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
धनश्री सध्या तिच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "महादेवाच्या कृपेने मी स्ट्राँग आहे. मला आता भीती वाटत नाही आणि आता मला कोणीही थांबवू शकत नाही. कामाच्या ठिकाणी मिळणारे प्रेम आणि आदर यावर विश्वास बसत नाहीये. हर हर महादेव", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
धनश्री डान्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. २२ डिसेंबर २०२० साली धनश्री आणि चहल यांनी लग्नगाठ बांधली. त्यांचे रील्स, डान्स व्हिडिओ नेहमी व्हायरल व्हायचे. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. लग्नानंतर ४ वर्षातच दोघंही घटस्फोट घेत आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशा यांचाही घटस्फोट झाला होता.