घटस्फोटानंतर ५ महिन्यांनी धनश्री वर्माचा Ex पतीबाबत मोठा खुलासा, म्हणाली- "मी अजूनही युजीच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:26 IST2025-09-03T17:24:32+5:302025-09-03T17:26:57+5:30

घटस्फोटानंतर धनश्रीने एक्स पती युजवेंद्र चहलबाबत मोठा खुलासा केला आहे. घटस्फोटानंतरही चहलसोबत बोलत असल्याचं तिने म्हटलं आहे. 

dhanashree verma revealed she is in contact with yuzvendra chahal after divorce | घटस्फोटानंतर ५ महिन्यांनी धनश्री वर्माचा Ex पतीबाबत मोठा खुलासा, म्हणाली- "मी अजूनही युजीच्या..."

घटस्फोटानंतर ५ महिन्यांनी धनश्री वर्माचा Ex पतीबाबत मोठा खुलासा, म्हणाली- "मी अजूनही युजीच्या..."

भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर ४-५ वर्षांतच चहल आणि धनश्री एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर धनश्रीने एक्स पती युजवेंद्र चहलबाबत मोठा खुलासा केला आहे. घटस्फोटानंतरही चहलसोबत बोलत असल्याचं तिने म्हटलं आहे. 

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान धनश्री वर्माच्या मुंबईतील घरी पोहोचली. याचा व्लॉग फरहाने तिच्या युट्यूब चॅनेलवरुन अपलोड केला आहे. यामध्ये ती धनश्रीला तिच्या पर्सनल आयुष्याबाबत प्रश्न विचारते. धनश्रीने खुलासा केला की घटस्फोटानंतर ती अजूनही युजवेंद्रच्या संपर्कात आहे. "मी अजूनही युजीसोबत मेसेजवरुन संपर्कात आहे. तो मला माँ म्हणायचा. तो खूप चांगला आहे", असं धनश्रीने म्हटलं. 


दरम्यान, धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ट्रेंडिंग गाण्यावरचे रील व्हिडिओही ती शेअर करत असते. धनश्रीने २०२०मध्ये क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. आता ती रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे.

Web Title: dhanashree verma revealed she is in contact with yuzvendra chahal after divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.