'देवमाणूस'मधील 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा आहे आर्मी ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 14:09 IST2022-03-07T14:08:55+5:302022-03-07T14:09:31+5:30

Devmanus: या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि उत्तम कथानक यांच्या जोरावर ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली.

devmanus serial vandi attya actress pushpa chaudhari real life story | 'देवमाणूस'मधील 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा आहे आर्मी ऑफिसर

'देवमाणूस'मधील 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा आहे आर्मी ऑफिसर

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'देवमाणूस' (devmanus). या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि उत्तम कथानक यांच्या जोरावर ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली. त्यामुळे प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा भाग 'देवमाणूस 2' देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या या मालिकेतील एक अभिनेत्री चांगलीच चर्चेत येत आहे. या अभिनेत्रीचा खऱ्या आयुष्यातील नवरा एका आर्मी ऑफिसर असल्याचं सांगण्यात येतं. 

'देवमाणूस' या मालिकेतील वंदी आत्या आठवते का? डिंपल आणि टोण्याच्या वंदी आत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ही भूमिका अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी साकारली आहे. स्वार्थी, पैशांसाठी आणि संपत्तीसाठी वाट्टेल ती शक्कल लढवणारी वंदी आत्या प्रेक्षकांना फारच भावली. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. विशेष म्हणजे वंदी आत्या अर्थात पुष्पा चौधरी या अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम गायिकादेखील आहेत.

पुष्पा चौधरी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा त्या त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमधील काही फोटो, व्हिडीओदेखील शेअर करत असतात. यात अलिकडेच त्यांनी त्यांच्या पतीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. लग्नाला ३८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हापासून त्यांच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहे.

दरम्यान, पुष्पा चौधरी यांचे पती एक सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर आहेत. विशेष म्हणजे पुष्पा चौधरी यांचा मोठा परिवार आहे. त्यांना तृप्ती आणि दिप्ती या दोन लेक असून त्यांचीही लग्न झाली आहेत.

Web Title: devmanus serial vandi attya actress pushpa chaudhari real life story