​इच्छा प्यारी नागिन या मालिकेत होणार आकाश तलवारची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 11:00 IST2017-02-23T05:30:11+5:302017-02-23T11:00:11+5:30

इच्छा प्यारी नागिन या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता इच्छाची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या ...

Desire to be the beloved Nagin of the sky sword entry | ​इच्छा प्यारी नागिन या मालिकेत होणार आकाश तलवारची एंट्री

​इच्छा प्यारी नागिन या मालिकेत होणार आकाश तलवारची एंट्री

्छा प्यारी नागिन या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता इच्छाची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या प्रियाल गौरने बबलच्या प्रेमाला नकार दिल्यानंतर इच्छा आणि बबल यांच्यात भांडणे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. 
मालिकेत आता मयुरेश या व्यक्तिरेखेची एंट्री होणार असून तो इच्छा आणि बबल यांच्या प्रेमात अडथळा ठरणार आहे. इच्छाचे लग्न करून देण्याचा विचार पेहलवान कुटुंब करणार आहेत आणि त्याचवेळी मयुरेशला पाहाताच क्षणी इच्छा आवडणार आहे. त्यामुळे तो विवाहाचा प्रस्ताव घेऊन पेहलवान परिवाराकडे जाणार आहे. पण लग्न करण्याची इच्छा नसल्याने इच्छा लग्न करण्यास नकार दिला आहे. इच्छाने लग्न करण्यास नकार दिल्याने मयुरेश इच्छा ही इच्छाधारी नागिन असल्याचे सगळ्यांना सांगण्याची तिला धमकी देणार आहे आणि या सगळ्यामुळे पेहलवान कुटुंबासमोर आपली खरी ओळख येऊ नये यासाठी इच्छा टेन्शनमध्ये येणार आहे. आता मयुरेशचे प्रेम इच्छासाठी त्रासदायक बनते का हे प्रेक्षकांना काहीच भागात करणार आहे. इच्छा मयुरेशच्या धमकीसमोर हार पत्करते का या सगळ्या गोष्टीतून स्वतःचा बचाव करते हे पाहाणे मनोरंजक ठरणार आहे. या मालिकेत एंट्री करण्याासठी आकाश तलवार खूप उत्सुक आहे. तो सांगतो, "इच्छा प्यारी या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा मी भाग झाल्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. इच्छाच्या मयुरेश प्रचंड प्रेमात असल्याने तिला मिळवण्यासाठी तो खूप सारे प्रयत्न करणार आहे. माझी या मालिकेतील भूमिका ही नकारात्मक असणार आहे. इच्छाबद्दल मयुरेशला सगळे माहीत असून तिची गुपित तो उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे." 

Web Title: Desire to be the beloved Nagin of the sky sword entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.