Independence Day 2023: “तेरी मिट्टी में मिल जावा...”, अमृता फडणवीसांनी गायलेलं गाणं ऐकलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 13:22 IST2023-08-15T13:21:56+5:302023-08-15T13:22:45+5:30
Independence Day 2023 : अमृता फडणवीसांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Independence Day 2023: “तेरी मिट्टी में मिल जावा...”, अमृता फडणवीसांनी गायलेलं गाणं ऐकलंत का?
आज देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वातंत्रदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खास व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. स्वातंत्रदिनानिमत्त अमृता यांनी ‘केसरी’ चित्रपटातील गाणं गायलं आहे.
२०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ चित्रपटातील “तेरी मिट्टी में मिल जावा” हे गाणं ऐकल्यानंतर आजही अंगावर काटा उभा राहतो. अमृता फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त हे गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्यातून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना दिली आहे. “भारतमातेप्रती असलेल्या एकनिष्ठतेमुळे आयुष्य आनंदी होतं. आपल्या देशभूमीसाठी जगण्याचा आणि बलिदान देण्याचा निश्चय करुया. भारतमाता की जय. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा,” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ साठी शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट...”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पेशाने बँकर आहेत. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक कार्यक्रमांना त्या उपस्थिती दर्शवितात. अमृता यांनी अनेक गाणी गायली आहेत. ‘कुणी म्हणाले’, ‘शिवतांडव स्त्रोतम’, ‘मूड बनायेगा’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.