दीपिका आणि शोएबने दाखवली बाळाची पहिली झलक, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 15:20 IST2023-09-22T14:55:52+5:302023-09-22T15:20:41+5:30

दीपिका आणि शोएबने चाहत्यांना मुलाची झलक तर दाखवलीच पण त्याचं नावही सांगितलं.

Deepika and Shoaib showed the first glimpse of the baby, shared a photo | दीपिका आणि शोएबने दाखवली बाळाची पहिली झलक, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Deepika and Shoaib

‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्करने 21 जुनला बाळाला जन्म दिला होता. हे प्री- मॅच्युअर बाळ होतं. दीपिका आणि शोएबने आता इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यांनी चाहत्यांना मुलाची झलक तर दाखवलीच पण त्याचं नावही सांगितलं. त्यांच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

 बाळाला जन्म दिल्यानंतर दीपिका कक्कर बाळाचे नाव काय ठेवणार असे चाहते विचारत होते. अखेर आज दीपिकाने बाळाचं नाव जाहीर केलं आहे. रुहान असे मुलाचे नाव ठेवल्याचे सांगितले. ‘रूहान’ अर्थात आत्मा, दयाळू आणि आत्म्याशी जोडणारे असं हे नाव आहे. 

शोएब इब्राहिमने मुलाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “तुम्हा सर्वांना मुलगा रुहानची ओळख करून देतोय. आमच्यावर कायमच आशीर्वाद असू द्या.” अनेक सेलिब्रिटींनी दीपिका आणि शोएबवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

दीपिका जानेवारी 2023 मध्ये ती गरोदर असल्याची घोषणा केली होती. गरोदर राहिल्यानंतरचा सर्व प्रवास वेळोवेळी दीपिकाने आपल्या युट्यूब चॅनेलवरून चाहत्यांशी शेअर केला. 

दीपिकाने 2011 मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दीपिका शोएबच्या प्रेमात पडली. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं. 

Web Title: Deepika and Shoaib showed the first glimpse of the baby, shared a photo