'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अपूर्वा शशांकच्या केळवणात दीपाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:08 IST2022-01-11T14:08:14+5:302022-01-11T14:08:44+5:30
सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' (Tipkyanchi Rangoli) या मालिकेत शशांक आणि अपूर्वाच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अपूर्वा शशांकच्या केळवणात दीपाची हजेरी
छोट्या पडद्यावरील ठिपक्यांची रांगोळी (Thipkyanchi Rangoli) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. तसेच रंग माझा वेगळा या मालिकेने देखील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक आणि अपूर्वाच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. संपूर्ण कानेटकर आणि वर्तक कुटुंब या लग्नासाठी उत्सुक आहेत आणि लग्नाआधीच्या विधींना सुरुवातदेखील झाली आहे. शशांक आणि अपूर्वाच्या केळवणात रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपाने हजेरी लावली आहे.
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. या दोघांचं केळवणही हटके असणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच या दोघांच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपा खास हजेरी लावणार आहे.
सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे हे कलाकार ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतात. तर रंग माझा वेगळा या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे दीपाची भूमिका साकारते आहे. शशांक आणि अपूर्वाच्या विवाह सोहळ्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.