मॅडम ते बाळ आहे, खेळणं नव्हे..., देबिना बॅनर्जीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 11:29 IST2022-04-27T11:28:20+5:302022-04-27T11:29:34+5:30

Debina Bonnerjee Trolled : होय, देबिनानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले.

Debina Bonnerjee Trolled For Holding Daughter Lianna Carelessly | मॅडम ते बाळ आहे, खेळणं नव्हे..., देबिना बॅनर्जीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

मॅडम ते बाळ आहे, खेळणं नव्हे..., देबिना बॅनर्जीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी  (Debina Bonnnerjee) आणि अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) यांना लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर कन्यारत्न झालं. काही दिवसांपूर्वीच देबिनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. लियाना असं त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव ठेवलं आहे. लियानाच्या येण्यानं देबिना व गुरमीत जाम खूश आहेत. पण तूर्तास देबिना ट्रोल होतेय. होय, देबिनानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले.

या व्हिडीओत देबिना तान्ह्या लियानाला घेऊन आहे. लियानाला एका हातात पकडून ती गाणं गुणगुणतांना दिसतेय. देबिनाने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो पाहताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.  देबिनानं ज्या पद्धतीने चिमुकल्या मुलीला पकडलं आहे, ते नेटकऱ्यांना आवडलं नाही. काही दिवसांच्या बाळाला एका हाताने कमरेवर पकडणं  नेटकऱ्यांना खटकलं. मग काय, अनेकांनी यावरून देबिनाला सुनावलं.

‘तुझ्या बाळासाठी काय योग्य आहे, हे तुला माहित असावं. पण काही दिवसाच्या बाळाला अशा पद्धतीनं पकडणं भीतीदायक आहे. तुम्हाला सर्व काही शेअर करायचं असतं आणि म्हणून आम्हाला बोलावं लागतं,’अशा आशयाची प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून एका युजरने दिली आहे. ‘तू इतक्या निष्काळजीपणे बाळाला कशी पकडू शकतेय,’असा सवाल एका युजरने केला. ‘मॅडम बाळ आहे, खेळणं नाही... आधी बाळाला घ्यायला शिक,’असं एका युजरने सुनावलं. ‘आधी त्या चिमुकल्या जीवाला चांगल्या पद्धतीने जवळ घे, स्टाईल नंतर मार,’अशा शब्दांत एकाने देबिनाचा क्लास घेतला.

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमीत चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2006 मध्ये देबिना व गुरमीत यांनी घरून पळून जाऊन लग्न केलं होतं. गुरमीतने या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. यानंतर 2011 साली गुरमीत व देबिना यांनी पुन्हा लग्न केलं. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं हे लग्न पार पडलं होतं.

Web Title: Debina Bonnerjee Trolled For Holding Daughter Lianna Carelessly