'दया, दरवाजा तोड़ दो'सोबत CID मध्ये परतला दया, या दिवशी भेटीला येणार मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 19:53 IST2024-11-23T19:52:39+5:302024-11-23T19:53:09+5:30
CID : दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरिचित कलाकार शिवाजी साटम (ACP प्रद्युमन), दयानंद शेट्टी (दया) आणि आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.

'दया, दरवाजा तोड़ दो'सोबत CID मध्ये परतला दया, या दिवशी भेटीला येणार मालिका
दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरिचित कलाकार शिवाजी साटम (ACP प्रद्युमन), दयानंद शेट्टी (दया) आणि आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि २१ डिसेंबरपासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर CID ची धमाकेदार सुरुवात होत आहे. हा शो दर शनिवारी आणि रविवारी रात्री १० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. प्रेक्षक या थरारक पुनरागमनाचे स्वागत करण्यास आणि आपल्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी उत्सुक आहेत.
मागील प्रोमोमध्ये, लोकप्रिय पोलीस अधिकारी दया याला लागलेली जीवघेणी गोळी पाहून चाहत्यांना धक्का बसला होता, ज्याला त्याचा जिवलग मित्र आणि पोलीस अधिकारी अभिजीत याने गोळी घातली होती. तथापि, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, धक्कादायक ट्विस्टमध्ये, दया त्याच्या स्टाईलमध्ये पुनरागमन करताना आणि कठोर संवादासह "दरवाजा तोडून" प्रवेश करताना दिसत आहे: "शत्रूदेखील मला मिटवू शकत नाही, मी परत आलोय लढण्यासाठी माझ्यासाठी आणि विसरलेल्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी'
दयाची लोकप्रिय भूमिका करणारा दयानंद शेट्टी आपला उत्साह शेअर करताना म्हणाला, “काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात रुतून बसतात. दया ही अशीच व्यक्तिरेखा आहे. इतक्या वर्षांनंतरही जे प्रेम आणि कौतुक मिळत आहे, ते पाहून मी भारावून गेलो आहे. मीम्स, जोक्स, संदर्भ – वगैरे जनमानसावरील दयाच्या प्रभावाचा पुरावा देतात. CID च्या नव्या सीझनमध्ये पुन्हा एकदा दयाची भूमिका करताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. मी हमी देतो की मी तीच तीव्रता आणि पॅशन पुन्हा घेऊन येईन, ज्याच्यामुळे लोकांनी या व्यक्तिरेखेवर इतके प्रेम केले. आणखी काही दरवाजे तोडण्याची आणि प्रकरणे सोडवण्याची वेळ आता आली आहे!”