'जरा तुझ्या मुलाचा तरी विचार कर'; भररस्त्यात दुसऱ्या नवऱ्याला लिपलॉक केल्यामुळे अभिनेत्री ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:59 IST2023-03-24T14:58:40+5:302023-03-24T14:59:15+5:30
Dalljiet kaur: अभिनेता शालीन भनोतला घटस्फोट दिल्यानंतर दलजीतने १८ मार्च रोजी बिझनेसमन निखील पटेलसोबत लग्नगाठ बांधली.

'जरा तुझ्या मुलाचा तरी विचार कर'; भररस्त्यात दुसऱ्या नवऱ्याला लिपलॉक केल्यामुळे अभिनेत्री ट्रोल
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर हिने अलिकडेच दुसरं लग्न केलं आहे. अभिनेता शालीन भनोतला घटस्फोट दिल्यानंतर दलजीतने १८ मार्च रोजी बिझनेसमन निखील पटेलसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे दलजीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. परंतु, दलजीतने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.
सध्या दलजीत सिंगापूरमध्ये तिचा हनीमून एन्जॉय करत आहे. येथील अनेक फोटो, व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मात्र, या हनीमूनमधील एक व्हिडीओ पोस्ट करुन ती चांगलीच ट्रोल झाली आहे. इतकंच नाही तर 'तुला एक मुलगा आहे याची जाणीव ठेव', असंही अनेकांनी तिला म्हटलं आहे.
दलजीतने तिच्या इन्स्टाग्रामवर नवऱ्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती पती निखीलसोबत रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिने रस्त्यात नाचत असताना सगळ्यांसमोर नवऱ्यासोबत लिपलॉक केलं. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले युजर्स
'तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप चढउतार पाहिले म्हणताय, मग हे असं वागून कसं चालेल', असं एका युजरने म्हटलं. तर, 'तो बिचारा तुमचा मुलगा त्याला काय वाटत असेल', असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. 'अगं या वयात तुला हे शोभत नाही, जरा तुझ्या मुलाचा तरी विचार कर', असं अन्य एका युजरने म्हटलं आहे.