फायर हूं मैं...झुकेगा नहीं साला..., ‘Masaledar Kitchen Kallakar’च्या सेटवर विनोद कांबळीचा कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:17 IST2022-05-04T14:15:38+5:302022-05-04T14:17:42+5:30

Masaledar Kitchen Kallakar : झी मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या शोचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यात विनोद कांबळी सर्वांचं लक्ष वेधून घेतोय

cricketer Vinod Kambli create pushpa dialogue in Masaledar Kitchen Kallakar | फायर हूं मैं...झुकेगा नहीं साला..., ‘Masaledar Kitchen Kallakar’च्या सेटवर विनोद कांबळीचा कल्ला

फायर हूं मैं...झुकेगा नहीं साला..., ‘Masaledar Kitchen Kallakar’च्या सेटवर विनोद कांबळीचा कल्ला

Masaledar Kitchen Kallakar : झी मराठी या वाहिनीवरचा ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो तुफान गाजला. इतकं की, पहिलं पर्व संपत नाही तेच या शोचं दुसरं पर्व ‘मसालेदार किचन कल्लाकार’ (Masaledar Kitchen Kallakar) सुरू झालं.  मराठी चित्रपटगृष्टील लोकप्रिय कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आतापर्यंत या शोच्या मंचावर हजेरी लावली आहे. आता मात्र क्रिकेटच्या मैदानावरचे धुरंदर या शोमध्ये धम्माल करताना दिसणार आहेत.

होय, आज ‘मसालेदार किचन कल्लाकार’ या शोमध्ये तीन दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambli ), सलील अंकोला (Salil Ankola) आणि अमोल मुजुमदार (Amol Muzumdar )या क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या तीन क्रिकेटपटूंची ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवरची जोरदार बॅटिंग प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. शिवाय किचनमधील त्यांची ‘प्रगती’ही या निमित्तानं प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तूर्तास या शोचा नवा प्रोमो तुफान व्हायरल होतोय.

झी मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या शोचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यात विनोद कांबळी सर्वांचं लक्ष वेधून घेतोय ते सुद्धा ‘पुष्पा’ या सिनेमातील लोकप्रिय डॉयलॉगने.

‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या... फायर हूं मैं...झुकेगा नहीं साला...’, असं विनोद कांबळी आपल्या अंदाजात म्हणतो. इतकंच नाही तर अगदी श्रीवल्ली गाण्यावर  थिरकतो... आजच्या भागात विनोंद कांबळीचा हा अनोखा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

क्रिकेटचे ग्लोव्स आणि हेल्मेट घालून शेंगदाणे सोलण्याचं आव्हानही हे क्रिकेटपटू पार पाडणार आहेत. एकंदर काय तर, धम्माल मज्जा, क्रिकेटच्या मैदानावरचे धम्माल किस्से असा हा शो रंगणार आहे.
 

Web Title: cricketer Vinod Kambli create pushpa dialogue in Masaledar Kitchen Kallakar