CoronaVirus: टेलिव्हिजन सेलिब्रेटी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संदेश देण्यासाठी आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 08:00 IST2020-04-24T08:00:00+5:302020-04-24T08:00:00+5:30
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काही सेलिब्रेटी कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे.

CoronaVirus: टेलिव्हिजन सेलिब्रेटी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संदेश देण्यासाठी आले एकत्र
संपूर्ण भारतीय टेलीविजन इंडस्ट्री सध्या फैलावणाऱ्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एक खूप विशेष आणि महत्वपूर्ण संदेश देण्यासाठी एकत्र आली आहे. या व्हिडीओसाठी एकता कपूरने महत्वपूर्ण भूमिका बजावली असून टेलीव्हिजन इंडस्ट्रीच्या अनेक प्रतिष्ठित आणि आघाडीच्या सदस्यांना तिने यासाठी एकत्र आणले आहे.
आज कोरोनाच्या अशा कठीण वेळी या लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी बसून कंटाळला आहे त्यावेळी, या व्हिडिओचा उद्देश्य सर्वांना प्रोत्साहित करणे, हा असणार आहे. टीवी इंडस्ट्रीचे अनेक कलाकार आणि रचनाकार यांनी एकत्र येऊन हा आकर्षक वीडियो बनवला आहे, जो अतिशय रोचक पद्धतीने घरी राहण्याचे महत्व अधोरेखित करतो.
या व्हिडियोमध्ये सिद्धार्थ शुक्ला, मौनी रॉय, शैलेश लोढ़ा, अनीता हसनंदानी, रोहिताश गौड़, मनीष पॉल, करिश्मा तन्ना यांसारखे आघाडीचे टेलीव्हिजन कलाकार दिसणार आहेत. यासोबतच रेमो डिसूजा देखील यात असणार आहे.
व्हिडियोमध्ये अशा प्रोडक्टिव गोष्टींची चर्चा करण्यात आली आहे, ज्याआधारे प्रत्येकजण आपापल्या घरात सुरक्षित राहून आपला वेळ व्यतीत करू शकेल.