Corona Virus: आणखी एका टीव्ही कपलचे लग्न लांबणीवर Corona Outbreak मुळे घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:38 IST2020-03-25T14:38:14+5:302020-03-25T14:38:58+5:30
याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच मोठे सोहळेही करण्यावरही बंदी आहे.

Corona Virus: आणखी एका टीव्ही कपलचे लग्न लांबणीवर Corona Outbreak मुळे घेतला निर्णय
कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच मोठे सोहळेही करण्यावरही बंदी आहे. काहीं सेलिब्रेटींनीही सामाजिक भाण जप लग्नांच्या तारखा पुढे ढकल्या आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपलनेही असाच निर्णय घेतला असून घरातच राहणे पसंत केले आहे.
'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी बॉयफ्रेंड कुणाल वर्मासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार होती. मात्र कोरोनामुळे त्यांनी आता सद्यपरिस्थितीत लग्न न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पूजा आणि कुणाल 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी 2017 मध्ये साखरपुडा केला होता. काही दिवसांपूर्वी पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाची घोषणा केली होती.
पूजा आणि कुणालप्रमाणेच बॉलिवूडमध्येही एका कपलने असाच निर्णय घेत लग्न पुढे ढकलले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल लग्नबंधनात अडकणार होते. मात्र कोरोनाचा वाढता उद्रेक पाहाता काही काळासाठी त्यांनी त्यांचे लग्नही लांबणीवर टाकले आहे.