'ट्रॉफी नको पैसे द्या, घरात खायला अन्न नाही..', अभिनेत्याने भावूक होत सांगितला किस्सा, म्हणाला- तुमचं रिकामं पोट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:53 AM2023-08-26T10:53:22+5:302023-08-26T11:00:41+5:30

अभिनेता म्हणाला, एकेकाळी माझ्या घरी एक वेळेचे जेवायला बनले इतके देखील अन्न नसायचे आणि पैसे देखील नसायचे.

comedian sudesh lehri recalls the days when he had to trade his award for money | 'ट्रॉफी नको पैसे द्या, घरात खायला अन्न नाही..', अभिनेत्याने भावूक होत सांगितला किस्सा, म्हणाला- तुमचं रिकामं पोट...

'ट्रॉफी नको पैसे द्या, घरात खायला अन्न नाही..', अभिनेत्याने भावूक होत सांगितला किस्सा, म्हणाला- तुमचं रिकामं पोट...

googlenewsNext

स्ट्रगल कुणालच चुकत नसतो. याला सेलिब्रेटीही अपवाद नाहीत. त्यांना ही  करिअरच्या सुरुवातील संघर्ष करावाच लागतो. आज इंडस्ट्रीत प्रसिद्ध मिळालेल्याही अनेक कलाकारांना संघर्ष चुकला नव्हता. कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता सुदेशी लहीरीने आपल्या  सुरुवातीच्या कठीण काळातील एका किस्सा अलीकडेच शेअर केला होता. 


विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो.सुदेश सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो..अलीकडेच सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे त्याने खाण्यासाठी पैसे नव्हते,  त्याहून अधिक ट्रॉफी होत्या अशी आठवण शेअर केली.
 
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातील आठवण शेअर करत सुदेशने सांगितलं, की एक वेळ अशी होती, की त्याच्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते, पण त्याहून अधिक ट्रॉफी घरात होत्या. त्याने पुरस्कार जिंकल्याने तुमचं रिकामं पोट भरता येत नाही, असंही म्हटलं आहे. आपल्या नव्या घरात शिफ्ट होत असताना, सुदेशने ट्रॉफी आणि पुरस्कारांनी भरलेल्या बॅगची एक झलक दाखवत यामागील  कटू सत्य जगाला दाखवलं.  सुदेशने आपली जुनी आठवण शेअर करत सांगितलं, की एक काळ असा होता, ज्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि कोणीतरी मला ट्रॉफी देऊन सन्मानित करणार होतं. त्यावेळी मी त्यांना ट्रॉफी नको, घरात खाण्यासाठी पैसे नाहीत, तुम्ही पैसे द्या असं सांगितलं होतं. पण त्यांनी ते असं करू शकत नसल्याचं सांगितलं.

सुदेशने आपल्या करिअरची सुरूवात 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'पासून केली होती. 'कॉमेडी सर्कस' आणि 'कॉमेडी क्लासेस'मधून छोट्या पडद्यावर तो तुफान हिट ठरला होता. यावेळी, त्याची जोडी कृष्णा अभिषेकसह जमली होती. दोघांचाही कॉमेडी अंदाज रसिकांच्या पंसतीस पात्र ठरला होता.
 

Web Title: comedian sudesh lehri recalls the days when he had to trade his award for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.