दोन महिन्यांच्या 'काजू'चं पहिलं लसीकरण; भारती सिंगला अश्रू अनावर, म्हणाली- "आई होणं सोपं नसतं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:47 IST2026-02-14T12:43:25+5:302026-02-14T12:47:52+5:30

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. मात्र, अलीकडेच तिला एका अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले, जिथे तिला अश्रू अनावर झाले. 

comedian Bharti Singh turn emotional after his second son kaju vaccination video viral | दोन महिन्यांच्या 'काजू'चं पहिलं लसीकरण; भारती सिंगला अश्रू अनावर, म्हणाली- "आई होणं सोपं नसतं..."

दोन महिन्यांच्या 'काजू'चं पहिलं लसीकरण; भारती सिंगला अश्रू अनावर, म्हणाली- "आई होणं सोपं नसतं..."

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. मात्र, अलीकडेच तिला एका अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले, जिथे तिला अश्रू अनावर झाले. भारतीचा मुलगा 'काजू' आता दोन महिन्यांचा झाला असून, त्याच्यावर पहिलं लसीकरण आलं. आपल्या चिमुकल्याला सुई टोचताना आणि त्याला वेदनेने रडताना पाहून भारती अत्यंत भावुक झाली आणि तिलाही रडू कोसळले.

भारती सिंगने तिच्या अधिकृत यु ट्यूब चॅनलवर या लसीकरणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारती आपल्या मुलाला कुशीत घेऊन हॉस्पिटलमध्ये बसलेली दिसत आहे. जेव्हा डॉक्टर काजूला इंजेक्शन देतात, तेव्हा तो जोरात रडू लागतो. मुलाला वेदनेत पाहून भारतीचा चेहराही रडवेला होतो आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागते. मुलाला अशा अवस्थेत बघणं तिला सहन होत नाही,  त्यामुळे ती दुसऱ्या रुममध्ये जाऊन रडायला लागते. "आई होणं सोपं नसतं," असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे.

या कठीण प्रसंगी भारतीचा पती हर्ष लिंबाचिया तिच्यासोबत होता. हर्षने केवळ मुलालाच नाही, तर भावूक झालेल्या भारतीलाही सांभाळून घेतले. हर्षने व्हिडिओमध्ये सांगितले की, पालकांसाठी हा काळ खूप भावनिक असतो, पण मुलाच्या आरोग्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. भारतीच्या या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत असून तिला धीर देत आहेत.

भारती सिंगच्या या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, "प्रत्येक आईला आपल्या मुलाला अशा प्रकारे पाहून रडू येतेच." भारतीने नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, त्यामुळेच तिचे चाहते तिला 'फेमस मॉम' म्हणून संबोधतात. भारती आणि हर्षच्या आयुष्यात दोन महिन्यांपूर्वीच 'काजू'चे आगमन झाले असून, या जोडप्याने अद्याप मुलाचा चेहरा पूर्णपणे जगासमोर आणलेला नाही.

Web Title : बेटे के पहले टीकाकरण पर भारती सिंह की आंखों में आंसू: 'मां बनना आसान नहीं'

Web Summary : कॉमेडियन भारती सिंह अपने बेटे 'काजू' के पहले टीकाकरण के दौरान भावुक हो गईं। उसे दर्द में देखकर, भारती रो पड़ीं। उन्होंने YouTube पर अनुभव साझा किया, जिसका शीर्षक था 'मां बनना आसान नहीं है'। पति हर्ष ने उनका साथ दिया।

Web Title : Bharti Singh Tears Up at Son's First Vaccination: 'Motherhood Isn't Easy'

Web Summary : Comedian Bharti Singh teared up during her son 'Kaju's' first vaccination. Seeing him in pain, Bharti became emotional and cried. She shared the experience on YouTube, captioning it 'Being a mother isn't easy'. Husband Harsh supported her.