लग्नातच हाती पडला घटस्फोटाचा कागद! 'अंतरपाट' मालिकेचा प्रोमो चर्चेत, कन्नड सिरीयलचा आहे रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:28 IST2024-05-28T13:17:32+5:302024-05-28T13:28:03+5:30
'अंतरपाट' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लग्नातच हाती पडला घटस्फोटाचा कागद! 'अंतरपाट' मालिकेचा प्रोमो चर्चेत, कन्नड सिरीयलचा आहे रिमेक
सध्या एका नव्या मालिकेची सगळीकडे चर्चा सुरू आहे. कलर्स मराठीवर 'अंतरपाट' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक नवी कोरी आणि वेगळी कथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतंच 'अंतरपाट' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'अंतरपाट' मालिकेच्या प्रोमोमध्ये कथेतील नायक असलेला क्षितीज आणि मुख्य नायिका गौतमी यांच्या लग्नाचा थाट पाहायला मिळत आहे. प्रत्येक मुलीप्रमाणेच गौतमीचंही लग्नाचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं प्रोमोत दिसत आहे. पण, लग्न लागताच क्षितीज गौतमीपुढे भर मांडवातच घटस्फोटाचे कागद देत तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करतो. या ट्विस्टमुळे अंतरपाट मालिका सुरू होण्याआधीच चाहत्यांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
'अंतरपाट' मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अशोक ढगे मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रेशम टिपनीस, तृष्णा चंद्रात्रे, प्रगल्भा कोलेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. १० मेपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांना कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.
कलर्स मराठीची ही नवी मालिका हिंदी मालिकेचा रिमेक आहे. 'अग्नीसाक्षी एक समझौता' या हिंदी मालिकेचा अंतरपाट मालिका रिमेक आहे. कलर्सवर 'अग्निसाक्षी' ही मालिका गेल्या वर्षी प्रसारित करण्यात आली होती. 'अग्निसाक्षी' नावाची कन्नड भाषेतील मालिका कलर्स कन्नड या चॅनेलवर प्रसारित होत होती. या मालिकेचा आधी हिंदीत रिमेक करण्यात आला. त्यानंतर आता मराठीत या मालिकेचा रिमेक होत आहे.