"झोपडपट्टीतून रोज आकाशातील तारे पाहणारा आज..." छाया कदम यांची गौरव मोरेसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:06 IST2026-04-08T09:05:43+5:302026-04-08T09:06:41+5:30

गौरव मोरे ज्या पवईतील फिल्टरपाड्यात लहानाचा मोठा झाला त्याच ठिकाणी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गौरव मोरेने नवीन घर घेतलंगौरव मोरेसाठी अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गौरवचं अभिनंदन केलं

Chhaya Kadam emotional post for Gaurav More buy new home at pawai filterpada | "झोपडपट्टीतून रोज आकाशातील तारे पाहणारा आज..." छाया कदम यांची गौरव मोरेसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

"झोपडपट्टीतून रोज आकाशातील तारे पाहणारा आज..." छाया कदम यांची गौरव मोरेसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

गौरव मोरेने पवईत घर घेतलं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. गौरव मोरे ज्या पवईतील फिल्टरपाड्यात लहानाचा मोठा झाला त्याच ठिकाणी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गौरव  मोरेने नवीन घर घेतलं. गौरव मोरेसाठी अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गौरवचं अभिनंदन केलं. छाया लिहितात, ''स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात. आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या लहानापासून प्रेमात वेडा असलेला गौरव पुढे त्याच्या अशाच स्वप्नांचं एक घर उभं करतो.''

छाया कदम पुढे लिहितात, ''फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा गौरव, स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो. जिद्द - चिकाटी आणि भारावलेपण घेऊन,अमिताभजींच्या प्रेमात ‘भूतनाथ’ झालेला गौरव, पुढे परिस्थितेच्या सगळ्या ‘दिवार’ तोडत, सोबत ‘शहेनशाह’ चा आत्मविश्वास घेऊन, आपल्या कामातून दरवेळी ‘शोले’ भडकवून, एक दिवस स्वतःच्या पायावर ‘डॉन’ सारखा उभा राहून, असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना ‘वजीर’ होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो. आणि हेच त्याचे आपलेपण गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ करतात.''




''कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो. आणि काय कमाल आहे, ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेले त्याचं झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे, आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवच गृहप्रवेश झाला. गौरव ! तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस. अजून खूप मोठा हो. इतका मोठा हो की एक दिवस तुझ्या यशाचा ‘जलसा’ करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे.''

''तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि घरासोबतच आयुष्यात आलेल्या जोडीदाराच्या ही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका . बाकी, तुझ्यातला ‘नटवरलाल’ असा अभिनय क्षेत्रातले तुझे ‘सरकार राज’ अबाधित ठेवो. खूप खूप प्रेम. शुभेच्छा. आणि शेवटचे... “ परंपरा - प्रतिष्ठा और अनुशासन... मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन.”

Web Title : झोपड़ी से महल तक: अभिनेता का सपना सच, आँखों में आए आँसू

Web Summary : अभिनेता गौरव मोरे ने पवई में घर खरीदकर अपना सपना पूरा किया। अभिनेत्री छाया कदम ने उन्हें बधाई दी, झुग्गी से सफलता तक की उनकी यात्रा को सराहा, समर्पण और कड़ी मेहनत को सराहा और उन्हें 'फिल्टरपाड़ा का बच्चन' कहा।

Web Title : Slumdog Millionaire: Actor's dream home inspires, brings tears to eyes.

Web Summary : Actor Gaurav More fulfilled his dream by buying a house in Powai. Actress Chhaya Kadam congratulated him, highlighting his journey from a slum to success, fueled by dedication and hard work, calling him 'Filterpada's Bachchan'.