Bigg Boss Marathi 3 : सुरेखा कुडचीनं व्यक्त केला मनातली खंत, ऐकून स्पर्धकही झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:58 IST2021-10-08T17:54:31+5:302021-10-08T17:58:39+5:30
Bigg Boss Marathi: सुरेखा कुडची आज त्यांच्या मनातील एक महत्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगताना दिसणार आहेत. नक्की असं काय झालं आहे ? अशी कोणती गोष्ट आहे ज्याचं त्यांना इतकं वाईट वाटलं आहे, राग आला आहे ?

Bigg Boss Marathi 3 : सुरेखा कुडचीनं व्यक्त केला मनातली खंत, ऐकून स्पर्धकही झाले थक्क
बिग बॉसच्या घरात राहणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस घरातील सदस्यांसाठी जणू अग्निपरीक्षाच असते. इथले टास्क आणि वादावादी याला कंटाळून घरातील सदस्य वारंवार घर सोडून जाण्याच्या वल्गना करतात.बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काही काही गोष्टी मनाला खूप लागतात, सतत काही ना काही गोष्टी त्यांना खुपतात आणि त्यावर तासन् तास चर्चा करत असतात. अनेकदा मनाला खटकलेल्या गोष्टी सगळ्यांपुढे मांडू शकत नाही आणि अशावेळी त्या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करतात. सुरेखा कुडची आज त्यांच्या मनातील एक महत्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगताना दिसणार आहेत. नक्की असं काय झालं आहे ? अशी कोणती गोष्ट आहे ज्याचं त्यांना इतकं वाईट वाटलं आहे, राग आला आहे ?
सुरेखा स्नेहा आणि जयला सांगत आहेत, “जेवण बनवताना उत्कर्ष, गायत्री, मीरा होते त्यावेळेस मी तिला म्हंटल स्नेहा पण होती तुम्ही सगळ्यांनी ठरवून आम्हांला चौघांना बाजूला काढलं आहे नॉमिनेट केले आहे. आम्ही तुमच्या दृष्टीने वीक आहोत म्हणजे कोण दादुस, मी, तृप्ती आणि स्नेहा ही पण नको आहे त्यांना. म्हणून मला तो राग आला की, जेव्हा कॅप्टन बनवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही विचार करता काय तो त्या टास्कमध्ये मस्त केलं.आम्ही नाही करू शकत, काही टास्कमध्ये आम्ही नाहीच खेळू शकतं.घरात असा एक तरी स्पर्धक असतो जो इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखतो.
आपल्या इथे सांगतात युक्ति वापरा. आपल्याकडे अजिबात युक्ति वापरली जात नाही. फक्त शक्तीचा वापर होतो जिथे आम्ही कमीच पडणार. आणि किचन एरिया जो आहे त्याला शून्य किंमत आहे. किती पण प्रेमाने जेवन करु द्या, जिवाचं रान करा त्याला किंमत नाहीये. त्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडू”. अजून हे संभाषण किती पुढे गेलं ? कोण कोणते मुद्दे सुरेखाने मत मांडले ? स्नेहाचं काय म्हणण आहे ? बिग बॉसच्या घरात नवा धुमाकूळ होणार ? घरातील वातावरण बदलणार? घर बनणार भांडणाचा आखाडा? या सगळ्याची उत्तरं आगामी भागात उलगडतील.