'मी पैसे परत देईन याची खात्री नव्हती'; अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली भाऊ कदमकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 16:45 IST2023-06-12T16:43:11+5:302023-06-12T16:45:13+5:30

Bhau kadam: घरच्यांनी दागिने गहाण टाकत भाऊ कदमच्या हातावर ठेवले होते पैसे

chala hawa yeu dya fame marathi actor bhau kadam open about his bad days memory | 'मी पैसे परत देईन याची खात्री नव्हती'; अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली भाऊ कदमकडे पाठ

'मी पैसे परत देईन याची खात्री नव्हती'; अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली भाऊ कदमकडे पाठ

'चला हवा येऊ द्या'च्या (chala hawa yeu dya) माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम अर्थात भाऊ कदम (bhau kadam). झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदमचं नाव आवर्जुन घेतलं. जातं. सध्या सोशल मीडियावर भाऊची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्याने स्ट्रगल काळात जवळच्या मित्रांनीही कशी पाठ फिरवली होती हे सांगितलं आहे.

काही काळापूर्वी भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला 'पांडू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने आणि त्यांच्या कुटुंबाने होम मिनिस्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात भाऊंनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, या आठवणी सांगत असतांना ते प्रचंड भावूक झाले.

"मी जेव्हा दुबईला गेलो तेव्हा पैसेच नव्हते माझ्याकडे. पासपोर्ट किंवा इतर सगळा खर्च मांजरेकर करणार होते.आपण फक्त जायचंय. त्यामुळे पैशांची काही तशी गरज नव्हती. पण जातांनाच पैसे नव्हते. फक्त खिशात काही तरी असावेत म्हणून मित्रांकडे मागितले. १-२ हजार किंवा ५ हजार द्या मला. पण, त्यांना ती शाश्वती नव्हती की मी पैसे परत करेन का? मी परत करणार होतो. काहीतरी करुन ते देणारच होतो", असं भाऊ म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "शेवटी घरच्यांनी मला काही पैसे दिले आणि म्हणाले हे घे, हे ठेव. त्यावर मी विचारलं की हे पैसे कुठून आले. तर ते म्हणाले की अंगठी विकली. आणि, वरुन म्हणाले यातून काहीही पैसे परत आणू नका. तुम्ही वापरा. पण मे पैसे खर्च करायची माझी डेरिंगच झाली. फक्त मुलांसाठी काही गोष्टी घेऊन आलो."

दरम्यान, भाऊ कदम हा संपूर्ण प्रवास सांगत असतांना त्यांच्या पत्नीच्या आणि लेकीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. इतकंच नाही तर तिथे उपस्थित असलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग भारावून गेला होता. 
 

Web Title: chala hawa yeu dya fame marathi actor bhau kadam open about his bad days memory