"तुला सोडावं लागेल, काळजी घे बाय…" गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार; कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:39 IST2025-07-24T11:36:28+5:302025-07-24T11:39:40+5:30
गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार, कोण आहे ती?

"तुला सोडावं लागेल, काळजी घे बाय…" गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार; कोण आहे ती?
सोशल मीडियावर आपल्या हटके कॉमिक टाइमिंगसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे गोरव मौरे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे गौरव घराघरात पोहोचला. आता हा विनोदवीर मराठीसह हिंदी कलाविश्वात काम करताना दिसत आहे. लवकरच तो 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच गौरव सध्या एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो मोबाइल फोनमध्ये पाहून कोणाशी तरी संवाद साधताना दिसतोय आणि त्या व्यक्तीला तो महिनाभर म्यूट करणार असल्याचं म्हणतोय. पण, 'ती' व्यक्ती कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
गौरव मोरेचा एक व्हिडीओ झी मराठीकडून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. ज्यात गौरव मोबाइलमध्ये तिच्या फोटोकडे पाहून म्हणतो, "जानू मला कळत नाहीये तुला कसं सांगू… आता ३० दिवस मी तुझ्या संपर्कात नसेन. ब्लॉक नाही करणार म्युट करेन…आपली ही शेवटची भेट… आपण एकत्र किती छान वेळ घालवला… एकत्र नवीन वर्षाची पार्टी केली, बॅचलर पार्टी केली, रविवारची दुपारची पार्टी, ऑफिसमधला तणाव… हे सगळं मी तुझ्यामुळे हँडल करू शकलो. पण, आता तुला सोडावं लागेल. काळजी घे बाय".
हा व्हिडीओ पाहताना गौरव हा एका मुलीशी संवाद साधतोय, असं भासतं. पण, गौरव जिच्याशी बोलता होता, ती मुलगी नाही तर कोंबडी होती. व्हिडीओच्या शेवटी मोबाइल फोनमधील कोंबडीचा फोटो दिसतो. गौरव हा मोबाईलमधील कोंबडीचा फोटोशी बोलत होता. हा मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. लवकरच श्रावण सुरू होतोय. गौरव श्रावणात मांसाहार करत नाही.