मोहम्मद घोरीला आव्हान देणारा शूर राजा! ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेची उत्सुकता, या तारखेपासून होणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:54 IST2025-06-03T11:53:24+5:302025-06-03T11:54:04+5:30

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेची उत्सुकता असून या मालिकेत पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील युद्ध बघायला मिळणार आहे

Chakravarti Samrat Prithviraj hindi serial promo telecast date and time | मोहम्मद घोरीला आव्हान देणारा शूर राजा! ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेची उत्सुकता, या तारखेपासून होणार सुरु

मोहम्मद घोरीला आव्हान देणारा शूर राजा! ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेची उत्सुकता, या तारखेपासून होणार सुरु

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ४ जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य ऐतिहासिक मालिका सुरु होणार आहे. एक निर्भीड प्रजा-रक्षक राजा पृथ्वीराज चौहान आणि भयंकर आक्रमणकर्ता मोहम्मद घोरी यांच्यातील युद्धाची कहाणी या मालिकेत बघायला मिळणार आहे. सर्वांना या मालिकेची चांगलीच उत्सुकता आहे. १२ व्या शतकातील ही गोष्ट केवळ युद्धाची गोष्ट नाही. यानिमित्ताने टेलिव्हिजन विश्वात अनोखी कथा बघायला मिळणार आहे.

मोहम्मद घोरी हा सत्तेच्या लालसेने भारत जिंकण्यासाठी आला होता. पण त्याच्या मार्गात आडवा आला, तो एक तरुण आणि शूर वीर राजा त्याचं नाव पृथ्वीराज चौहान. युद्धाची रणनीती ही पृथ्वीराज चौहानची मोठी ताकद होती. 


या भव्य मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे राजमातेची भूमिका साकारत आहेत. जी पृथ्वीराजची आजी आहे. तिच्या अभिनयामुळे मालिकेला एक भावनिक  गहिरेपण आले आहे. पद्मिनी कोल्हापुरे म्हणतात, “मी जेव्हा जेव्हा पृथ्वीराज चौहान हे नाव ऐकते तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो. ते फक्त एक योद्धा नव्हते, तर ते आजही शौर्याचे प्रतीक मानले जातात. आपण अनेक युद्धे पाहिली आहेत. पण पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात झालेले युद्ध हे अशा युद्धांपैकी एक आहे, जे आपल्या आठवणीत कोरले गेले आहे. कोवळ्या वयात राजा झालेल्या पृथ्वीराजने अत्यंत ताकदीने लढा दिला. आपल्या देशाच्या रक्षणाची त्याने प्रतिज्ञा केली होती आणि आपल्या जीवनातून त्याने हे दाखवून दिले की, तुमच्याकडे ताकद आली, की त्यासोबत मोठी जबाबदारी देखील येते.”




‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  ही भव्य ऐतिहासिक मालिका  ४ जून पासून दर सोम ते शुक्र रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवरून पाहायला मिळणार आहे. सर्वांना या मालिकेची खूप उत्सुकता आहे.

Web Title: Chakravarti Samrat Prithviraj hindi serial promo telecast date and time