बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगनं तेजस्विनी लोणारीला दिल्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 20:28 IST2022-11-24T20:27:50+5:302022-11-24T20:28:24+5:30
Ranveer Singh : रणवीर सिंगने एका व्हिडिओमार्फत तेजस्विनीला चिअर अप केले आहे.

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगनं तेजस्विनी लोणारीला दिल्या शुभेच्छा!
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन(Bigg Boss Marathi 4)चा अर्धा टप्पा पूर्ण झाला असून, घरात टिकून राहणाऱ्या सदस्यांसाठी उर्वरीत ५० दिवसांचा खेळ आणखीन खडतर होत जाणार आहे. या स्पर्धकांमध्ये तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) हिला सर्वाधिक पसंती मिळत असून, तिच्या खेळाची दखल आता बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याने देखील घेतली आहे.
रणवीरने एका व्हिडिओमार्फत तेजस्विनीला चिअर अप केले आहे. जिंकून आल्यानंतर एकत्र पार्टी करू अश्या संदेशपर शुभेच्छा रणवीरने तिला दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील आपले वास्तव्य टिकून ठेवण्यासाठी स्पर्धकांच्या मानसिक, बौध्दीक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागत असतो, आणि त्यासाठी प्रत्येकजण साम, दाम, दंड आणि भेद याद्वारे शर्थीचा प्रयास करत असतो. मात्र, तेजस्विनीची खेळी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे !
तिच्या नम्र आणि सामंजस्य स्वभावामुळे तिने चाहत्यांचे मन तर जिंकलेच पण त्यासोबतच तिला बिगबॉस मराठीच्या माजी स्पर्धकांचादेखील सपोर्ट मिळत आहे. या आधी बिग बॉस मराठी सीजन १ ची विजेती मेघा धाडे आणि गतवर्षीच्या सीजन ३ चा वाईल्ड कार्ड सदस्य आदिश वैद्य ने तेजस्विनीच्या खेळाच कौतुक केलं होतं. इतकचं नव्हे तर विकेंडची चावडी असो वा राणी मुंगीचा टास्क असो तेजस्वीनी घरच्या सदस्यांची देखील फेव्हरेट ठरली आहे.