'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं पहिलं घर, किंमत आहे तब्बल ५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:27 IST2025-04-01T13:27:11+5:302025-04-01T13:27:33+5:30
बिग बॉस फेम अभिनेत्रीने तिचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं पहिलं घर, किंमत आहे तब्बल ५ कोटी
मुंबईत घर घेणं हे या शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचंच स्वप्न असतं. स्वत:चं, हक्काचं घर असावं हे प्रत्येकालाच वाटत असतं. पण, या स्वप्ननगरीत वाढलेल्या घराच्या किमती पाहता प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. पण, बिग बॉस फेम अभिनेत्रीने तिचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. 'बिग बॉस ओटीटी' फेम अभिनेत्री मनिषा राणीने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं आहे.
मनिषा राणीने मुंबईतील गोरेगाव येथे स्वत:चं घर खरेदी केलं आहे. मुंबईतील मनिषा राणीने खरेदी केलेलं हे पहिलंच घर आहे. गोरेगावमधील एका आलिशान बिल्डिंगमध्ये १७व्या मजल्यावर अभिनेत्रीने हे घर खरेदी केलं आहे. या घराला बाल्कनीदेखील आहे. त्यामुळे मनिषा रानीसाठी हे घर आणखीनच खास आहे. कित्येक वर्षांपासून पाहिलेलं अभिनेत्रीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. या घराची किंमत तब्बल ५ कोटींच्या घरात आहे. सोशल मीडियाावर पोस्ट शेअर करत मनिषा राणीने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मनिषा राणी हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. बिग बॉस ओटीटी २मध्ये मनिषा राणी सहभागी झाली होती. सलमान खानच्या या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. या सीझनचा विनर असलेल्या एल्विश यादवसोबत तिची चांगली मैत्री होती. या सीझनच्या टॉप फायनलिस्टपैकी मनिषा एक होती.