श्रेया बुगडेच्या हॉटेलला चित्रा वाघ यांनी दिली भेट, म्हणाल्या, "इथलं जेवण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:37 IST2024-01-30T15:34:33+5:302024-01-30T15:37:37+5:30

श्रेयाच्या हॉटेलमध्ये भाजपाच्या चित्रा वाघ यांची हजेरी, म्हणाल्या, "आता ती लोकांच्या मनातही..."

bjp chitra wagh visits shreya bugde new hotel praises actress said food is delicious | श्रेया बुगडेच्या हॉटेलला चित्रा वाघ यांनी दिली भेट, म्हणाल्या, "इथलं जेवण..."

श्रेया बुगडेच्या हॉटेलला चित्रा वाघ यांनी दिली भेट, म्हणाल्या, "इथलं जेवण..."

मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. 'चला हवा येऊ द्या' शोमधून लोकप्रियता मिळवलेल्या श्रेयाने नुकतंच व्यवसायात पाऊल टाकलं आहे. श्रेयाने नवं रेस्टॉरंट सुरू करत हॉटेल व्यवसायातील तिच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 'द बिग फिश अँड कंपनी' असं श्रेयाच्या हॉटेलचं नाव असून नुकतंच या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. श्रेयाच्या या रेस्टॉरंटला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही भेट दिली. 

श्रेयाच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटन समारंभावेळी चित्रा वाघ यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी संवाद साधला. श्रेया बुगडेचं कौतुक करत चित्रा वाघ म्हणाल्या, "श्रेया घराघरात पोहोचलेली आहे. आता ती लोकांच्या मनामनातही पोहोचेल. कारण, मनात पोहोचण्याचा रस्ता पोटातून जातो. याचं प्लॅनिंग गेलं वर्षभर सुरू आहे. प्रत्येक गोष्ट इथे विचार करुन केली गेली आहे. खुर्ची कशी असावी, ताट कसं असावं...या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. येणारा प्रत्येक माणूस जेवण तृप्त होऊन गेला पाहिजे, या अनुषंगाने ही संपूर्ण टीम काम करत आहे." 

"आज माझी येण्याची ही दुसरी वेळ आहे. १ वाजता बंद नको व्हायला म्हणून मी पळत पळत आले. इथलं जेवणही खूप सुंदर आहे. आपण बाकी ठिकाणीही जेवतो. तिथलं जेवणंही चांगलं असतं. पण, काही पदार्थ हे मन ओतून बनवले जातात. कोथिंबीर वडी, व्हेज घी रोज असे अनेक पदार्थ आहेत. विशेष म्हणजे वरण भाताबरोबर खाता येतील अशा बटाट्याच्या काचऱ्याही इथे आहेत. त्यामुळे पटपट खाणाऱ्यांपासून साग्रसंगीत जेवणाऱ्यांपर्यंत सगळ्यांची सोय श्रेयाने इथे केलेली आहे. अशी अनेक हॉटेल्स होऊ दे यासाठी तिला मनापासून शुभेच्छा," असंही पुढे चित्रा वाघ म्हणाल्या. 

श्रेयाने दादरमध्ये तिचं हे नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. 'द बिग फिश अँड कंपनी' हे तिचं रेस्टॉरंट सीफुड साठी स्पेशल आहे.  त्यामुळे खवय्यांची नक्कीच चंगळ असणार आहे. 

Web Title: bjp chitra wagh visits shreya bugde new hotel praises actress said food is delicious