वडिलांना बिलगलेल्या 'या' क्यूट मुलाला ओळखलं का? आज करतोय असंख्य तरुणींच्या मनावर राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:13 IST2022-02-02T16:12:18+5:302022-02-02T16:13:23+5:30
TV actor: बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेल्या एका सदस्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा अभिनेता त्याच्या वडिलांना बिलगल्याचं दिसून येत आहे.

वडिलांना बिलगलेल्या 'या' क्यूट मुलाला ओळखलं का? आज करतोय असंख्य तरुणींच्या मनावर राज्य
सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अनेकदा ते त्यांच्या जीवनातील लहान-मोठे किस्से, क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात सध्या बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेल्या एका सदस्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा अभिनेता त्याच्या वडिलांना बिलगल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो या अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे फोटोमध्ये दिसणारा हा क्युट मुलगा आज असंख्य तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे हा अभिनेता नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता करण कुंद्रा आहे. करण सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा त्याचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो
दरम्यान, करण अलिकडेच बिग बॉस १५ मध्ये झळकला होता. या शोमध्ये तो सेकंड रनरअप ठरला आहे. तसंच या शोव्यतिरिक्त तो अनेक मालिकांमध्येही झळकला आहे.