'बिग बॉस ओटीटी'चा चौथा सीझन येणारच नाही? मेकर्सने घेतला मोठा निर्णय; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:39 IST2026-01-20T13:38:17+5:302026-01-20T13:39:18+5:30
बिग बॉस ओटीटीच्या तीन सीझननंतर मेकर्सने असा निर्णय का घेतला?

'बिग बॉस ओटीटी'चा चौथा सीझन येणारच नाही? मेकर्सने घेतला मोठा निर्णय; कारण...
'बिग बॉस' हा शो गेल्या १९ वर्षांपासून टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. सध्या बिग बॉसचा १९ वा सीझन सुरु आहे. मधल्या काळात 'बिग बॉस ओटीटी'ही सुरु झालं होतं. याचे तीन सीझन आले होते. बिग बॉस ओटीटी दीड ते दोन महिन्याचंच होतं. आता लोकांना बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनचीही प्रतिक्षा होती. मात्र मेकर्सने बिग बॉस ओटीटी बंदच करण्याचा निर्णय घेतला आहे.
'बिग बॉस तक'वर आलेल्या माहितीनुसार, बिग बॉस ओटीटी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलं आहे. आता हिंदीत केवळ एकच बिग बॉस प्रसारित होईल असा निर्णय मेकर्सने घेतला आहे. टीव्ही आणि ओटीटी दोन्ही ठिकाणी एकच शो दिसेल. सध्या बिग बॉस १९ ओटीटीवरही पाहता येत आहे.
'बिग बॉस ओटीटी'चा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. दिव्या अग्रवाल सीझनची विजेती होती. नंतर सीझन २ सलमान खाननेच होस्ट केला होता. याचा विजेता एल्विश यादव होता. तर तिसरा सीझन अनिल कपूरने होस्ट केला होता. याची विजेती सना मकबूल होती. आता चौथ्या सीझन येणारच नाही असा निर्णय सध्या घेण्यात आला आहे.
प्रेक्षकही या निर्णयाला सहमती दर्शवत आहेत. 'ओटीटीवर वेगळ्या बिग बॉसची गरजच नाही जेव्हा की टीव्ही आणि ओटीटी दोन्ही ठिकाणी शो बघता येतो','रोजचं बिग बॉस ओटीटीवरही स्ट्रीम होतं त्यामुळे निर्णय योग्यच आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.