Bigg Boss OTT: बिग बॉसचं नवं घर पाहिलंत का?, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:48 IST2021-08-07T17:47:35+5:302021-08-07T17:48:09+5:30
यंदाचा बिग बॉस शो टेलिव्हिजनवर येण्याआधीच खूप चर्चेत आला आहे.

Bigg Boss OTT: बिग बॉसचं नवं घर पाहिलंत का?, व्हिडीओ होतोय व्हायरल
यंदाचा बिग बॉस शो टेलिव्हिजनवर येण्याआधीच खूप चर्चेत आला आहे. येत्या ८ ऑगस्टपासून हा शो वूट अॅपवर भेटीला येणार आहे. बिग बॉस ओटीटीवर करण जोहर हा शो होस्ट करताना दिसणार आहे. एक तासाच्या एपिसोड व्यतिरिक्त या शोमधील सर्व स्पर्धकांना २४ तास लाइव्ह पाहता येणार आहे. टेलिव्हिजनच्या आधी सहा आठवड्यांआधीच सुरू होणाऱ्या या बिग बॉस ओटीटीला निर्मात्यांनी आणखी एण्टरटेनिंग बनवणार आहेत.
बिग बॉसचे नवे घर कसे असेल, या घरात कोण कोण असणार, कोणते नवीन नियम असतील असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतीलच. बिग बॉसच्या घराचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओत बिग बॉसच्या घराची पहिली झलक पहायला मिळतेय.
वूटने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिग बॉस ओटीटीच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बिग बॉसचे नवे घर पहायला मिळते आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, ‘आता फक्त काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आम्ही आरतीचे ताट घेऊन सज्ज आहोत. घराची पहिली झलक दाखवताना बॅकग्राऊंडला कभी ख़ुशी कभी गम’ हे गाणे ऐकायला मिळत आहे.
बिग बॉसच्या नव्या घराचे डिझाइन खूपच कुल दिसत आहे. यंदाच्या सीजनमध्ये घरातील सिटिंग अरेंजमेंट आणि फर्नीचर खूप भारी दिसत आहे. किचन, डायनिंग एरिया, गर्डन एरिया सर्व काही लक्ष वेधून घेत आहे.