Divya Agarwalने वरुण सूदसोबत ब्रेकअपनंतर मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा, फ्लॉन्ट केली रिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 01:19 PM2022-12-06T13:19:51+5:302022-12-06T13:25:56+5:30

Divya Agarwal Engagement : दिव्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची रिंग फ्लॉन्ट करत अपूर्वासोबत रोमँटिक पोझ देताना दिसतेय.

Bigg boss ott fame Divya Agarwal announced her engagement with businessman Apurva Padgaonkar on her birthday after break up with Varun Sood | Divya Agarwalने वरुण सूदसोबत ब्रेकअपनंतर मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा, फ्लॉन्ट केली रिंग

Divya Agarwalने वरुण सूदसोबत ब्रेकअपनंतर मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा, फ्लॉन्ट केली रिंग

googlenewsNext

Divya Agarwal Relationship With Apurva Padgaonkar:बिग बॉस OTT विजेती दिव्या अग्रवाल(Divya Agarwal)ने 5 डिसेंबर रोजी तिचा 30 वा वाढदिवस तिच्या मित्र आणि कुटुंबासह साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी दिव्याने अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 9 महिन्यांपूर्वी वरुण सूद(Varun Sood)सोबत तिचे ब्रेकअप झाले होते.

दिव्या अग्रवालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपूर्व पाडगावकरसोबतचे फोटो शेअर करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दिव्याच्या 30 व्या वाढदिवशी अपूर्व पाडगावकरने तिला अंगठी घालून प्रपोज केले. समोर आलेल्या फोटोंमध्ये, दिव्या तिची रिंग फ्लॉन्ट करताना अपूर्वासोबत रोमँटिक पोझ देत आहे.दिव्या अग्रवालचा होणारा नवरा अपूर्व हा एक बिझनेसमन आहे आणि त्याचे मुंबईत अनेक रेस्टॉरंट आहेत.

दिव्या अग्रवाल यापूर्वी ती वरुण सूदला अनेक वर्षांपासून डेट करत होती. दोघेही बराच काळ सोबत होते. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या, पण या वर्षी मार्चमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून वरुण आणि तिच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. ब्रेकअपनंतर आता नऊ महिन्यांनंतर अभिनेत्रीने अपूर्वाशी  एंगेजमेंट केली. 
 

Web Title: Bigg boss ott fame Divya Agarwal announced her engagement with businessman Apurva Padgaonkar on her birthday after break up with Varun Sood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.