बिग बॉस OTT 3 प्रोमो आउट ! ड्रामा आणि रोलर कोस्टरची पर्वणी देणार होस्ट अनिल कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 17:42 IST2024-06-10T17:41:42+5:302024-06-10T17:42:20+5:30
Bigg Boss OTT 3 : बहुप्रतीक्षित रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ चा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांना आता शोबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली आहे.

बिग बॉस OTT 3 प्रोमो आउट ! ड्रामा आणि रोलर कोस्टरची पर्वणी देणार होस्ट अनिल कपूर
बहुप्रतीक्षित रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Bigg Boss OTT 3)चा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांना आता शोबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षक या शोसाठी वाट बघत आहेत. प्रोमोमध्ये अनिल कपूर(Anil Kapoor)ला शोचा नवीन होस्ट अशी ओळख करून देण्यात आली असून बिग बॉसच्या घराप्रमाणेच या प्रोमोमध्ये देखील दमदार ड्रामा दिसतोय यात शंका नाही.
मेगास्टार अनिल कपूर त्याच्या अनोख्या शैलीने घरात धमाल करणार आहेत याची शाश्वती तर देत आहेत. हा दमदार ड्रामा लवकरच सुरू होणार आहे. प्रेक्षकांना या शो बद्दल खूप उत्सुकता असून आता नवीन काय होणार हे बघणे उत्कंठावर्धक ठरणार आहे. बिग बॉस ओटीटीचे मागील सीझन करण जोहर आणि सलमान खान यांनी होस्ट केले होते.
प्रत्येक सीझन हा तितकाच खास ठरला आणि तो अनोखा देखील झाला. आता आगामी सीझन अनिल कपूर कसे स्पर्धकांना कसं हॅण्डल करणार हे बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. अनिल कपूरने एक अभिनेता म्हणून त्याचे अष्टपैलुत्व दाखवले आहे आणि म्हणूनच त्याचे होस्ट म्हणून पदार्पण पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत!
अभिनेत्याचे आगामी प्रोजेक्ट
रिॲलिटी शोचा हा अत्यंत प्रतीक्षेत असलेला सीझन २१ जूनपासून OTT वर प्रसारित होणार आहे. दरम्यान अनिल कपूरने अलीकडेच ‘ॲनिमल’, ‘फाइटर’ आणि ‘क्रू’ या त्याच्या निर्मिती उपक्रमासह सलग हिट चित्रपट दिले. आता तो सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे.