Bigg Boss Marathi : 'या' कारणामुळे विणा – शिवला मिळणार शिक्षा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 14:17 IST2019-07-30T14:14:52+5:302019-07-30T14:17:25+5:30
शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खडया व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूल मध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत.

Bigg Boss Marathi : 'या' कारणामुळे विणा – शिवला मिळणार शिक्षा !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. ज्यामध्ये बिग बॉस यांनी कार्यासंबंधातले काही नियम आखून दिले आहेत... ज्यांचे उल्लंघन टास्क दरम्यान कोणीच करू शकत नाही... बिग बॉसचे नियम सगळ्या सदस्याना पाळणे बंधनकारक असते. पण शिव आणि विणाकडून महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन या कार्यादरम्यान होणार आहे.
बिग बॉस सगळ्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्या दरम्यान दिलेल्या सामुग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे. पण, कार्या दरम्यान शिव आणि विणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळे शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खडया व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूल मध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत.
काल बिग बॉसने सदस्यांवर एक कार्य सोपवले ज्यानुसार त्यांना टॉप २ आणि बॉटम २ सदस्यांची नावे द्यायची होती ज्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार होती. सदस्यांनी टॉप २ मधील फक्त एकाच सदस्याचे नाव दिले ते म्हणजे अभिजीत केळकर दुसरे नाव बिग बॉसनेच सांगितले जे सदस्यांनीच चर्चेमध्ये घेतले होते आरोह वेलणकर आता अभिजीत आणि आरोहमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. या टास्क मध्ये कोणता ग्रुप शक्ति पेक्षा युक्ति वापरुन हा टास्क त्यांच्या उमेदवारासाठी जिंकेल हे पाहणे रंजक असणार आहे. आरोहच्या टीममध्ये शिवानी, अभिजीत बिचुकले, वीणा आणि नेहा असणार आहेत तर अभिजीत केळकरच्या टीममध्ये किशोरी, रूपाली, शिव आणि हीना असणार आहेत.