Bigg Boss Marathi 5: "माझं डोकं पिकायला लागलंय", असं का म्हणतोय गुलीगत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:47 IST2024-07-30T13:46:28+5:302024-07-30T13:47:22+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवशी सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

Bigg Boss Marathi 5: "माझं डोकं पिकायला लागलंय", असं का म्हणतोय गुलीगत?
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवशी सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. दरम्यान 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना निर्णय घेण्यात कमी असलेल्या तीन सदस्यांची निवड करायला सांगितले होते. सदस्यांनी सर्वानुमते सूरज चव्हाण (Suraj Chavan), इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार या तीन सदस्यांची नावे घेतली. पण आजच्या भागात याच तीन सदस्यांना 'बिग बॉस'ने निर्णय घ्यायला लावला असल्याचं पाहायला मिळणार आहे. सूरज चव्हाणला निर्णय घेण्यात जास्त वेळ लागत असल्याने आजच्या भागात तो म्हणतो,"माझं डोकं पिकायला लागलंय".
इरिना, सूरज आणि धनंजय यांना 'बिग बॉस' त्यांच्याकडे असलेल्या बीबी करन्सीमधून घरासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि किराणा विकत घ्यायला सांगतात. दरम्यान डीपी म्हणजेच धनंजय पोवार म्हणतो,"आपल्याला चणा डाळ आणि मूग डाळ तर घ्यावं लागेल". त्यावर इरिना म्हणते,"सगळंच घ्या... निर्णय घेण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे". इरिना आणि धनंजयच्या संभाषणावर सूरज म्हणतो,"आता माझं डोकं पिकायला लागलंय". तर धनंजय म्हणतो,"माझं फुटलं". यावर सूरज पुढे म्हणतो, "तुझं फुटलंय माझं तुटेल".
सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार घरातील सदस्यांसाठी काय-काय किराणा घेणार?, घरातील सदस्यांना लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी मिळणार का?, डिसिजन टेकर नसलेले सदस्य 'बिग बॉस मराठी'च्या घरात डिसिजन कसा घेणार? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहावा लागेल. बिग बॉस मराठी दररोज, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.