सूरज चव्हाणसोबतच झाला 'गुलीगत धोका'! 'नॉमिनेशन' शब्दच म्हणता येईना; मग DP दादाने त्याला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:46 IST2024-07-31T14:45:33+5:302024-07-31T14:46:24+5:30
Bigg Boss Marathi season 5 : 'नॉमिनेशन' म्हणताना सूरजची झाली पंचाईत

सूरज चव्हाणसोबतच झाला 'गुलीगत धोका'! 'नॉमिनेशन' शब्दच म्हणता येईना; मग DP दादाने त्याला...
Bigg Boss Marathi season 5 : टिकटॉक, सोशल मीडियावरचा मराठमोळा स्टार सुरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या 'बिग बॉस' च्या घरात आहे. बिग बॉसमधून तो सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. टिक टॉकवरुन अनेक कलाकारांचं आयुष्य बदललं होतं. त्यातच होता सूरज चव्हाण. अतरंगी हेअरस्टाईल, तो बोलत असलेले डायलॉग खूप व्हायरल झाले होते. 'गुलीगत' असं त्याच्या हँडलचं नाव होतं. सूरज चव्हाण बारामतीतील मोडवे गावातला असून खूपच साधा आहे. त्याच्या याच साधेपणाचा अंदाज नुकताच बिग बॉसमध्येही आला.
कलर्स मराठीने बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सूरज चव्हाण, धनंजय पोवार, पॅडी आणि घन:श्याम दरवडे बोलताना दिसत आहेत. यावेळी सूरजला 'नॉमिनेशन' हा शब्द बोलताना त्याला अडचण येतीये. त्याला हा इंग्रजी शब्द बोलताच येत नाहीए. 'नॉमिठीत' असंही तो एकदा म्हणतो. तेव्हा सोबत असलेले धनंजय पोवार, पॅडी आणि घन:श्याम त्याला शिकवताना दिसत आहेत. सूरजही त्यांचं ऐकून प्रयत्न करतोय. धनंजय पोवार त्याचं प्रोत्साहन वाढवतोय. लोकांना दिसायला नको तू प्रयत्न करतो आहेस, असं तो त्याला म्हणतो.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत सूरजच्या साधेपणाचं कोतुक केलंय. इतकंच नाही तर धनंजय पोवार, पॅडी आणि घन:श्यामचंही कौतुक केलंय. सूरजची थट्टा न करता ते त्याला मदत करत आहेत हे पाहून चांगलं वाटलं असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 'घरचे सदस्य हसण्याऐवजी त्याची मदत करत आहे हीच मराठी लोकांची ओळख' असं म्हणत त्यांचं कौतुक केलंय. अभिनेता पुष्कर जोगनेही कमेंट करत लिहिले, 'सूरज साधा आहे, देव त्याचं भलं करो.'