छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:11 IST2024-07-31T19:11:11+5:302024-07-31T19:11:45+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : नवीन पर्व सुरू झाल्यापासून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेची तोफ आता धडाडलेली पाहायला मिळणार आहे.

छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला...
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi 5) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या दिवसांपासून घरात राडे पाहायला मिळत आहे. नवीन पर्व सुरू झाल्यापासून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेची तोफ आता धडाडलेली पाहायला मिळणार आहे. नुकताच शोचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यात घनःश्यामने धनंजयला नॉमिनेट केले आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोत घन:श्याम म्हणतोय,"सकाळी माझ्या शरीराचा जर डीपी दादाला हात लागला तर त्यांना वाटलं मला गुदगुल्या झाल्या. कॅमेऱ्यासमोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो. मी डायरेक्ट डीपी दादाला नॉमिनेट करतोय". एकंदरीतच घन:श्यामची तोफ धडाडली असून त्याने थेट कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच नॉमिनेट केले आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील १६ सदस्य आपल्या स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील या पाच सदस्यांपैकी कोणाचा प्रवास संपणार हे लवकरच समोर येईल. ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.