Bigg Boss Marathi 5 : "स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे...", डीपीनं सूरजला चांगलंच झापलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 14:00 IST2024-08-15T14:00:07+5:302024-08-15T14:00:37+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये आता तीन आठवडे झाले आहेत. या आठवड्यात सुद्धा सदस्यांमध्ये चांगलाच वादविवाद होताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi 5 : "स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे...", डीपीनं सूरजला चांगलंच झापलं
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)मध्ये आता तीन आठवडे झाले आहेत. या आठवड्यात सुद्धा सदस्यांमध्ये चांगलाच वादविवाद होताना दिसत आहेत. कधी भांडण, कधी टास्क, तर कधी एकत्र केलेली मजामस्ती यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. आजच्या भागात सूरजला समजावण्याचा धनंजय पोवारचा तिखट कोल्हापुरी अंदाज पाहायला मिळणार आहे.
आजच्या भागात डीपी सूरजला समजावत म्हणतोय,"स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे. उद्या आमच्यात खेळताना समोर अरबाज, वैभव कोणीही असले तरी असं खेळू नको. सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. खेळात छान खेळलं पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे". त्यानंतर अभिजीत आणि पॅडी डीपीला जाऊ दे एवढं नको बोलूस असे म्हणतात. त्यावर डीपी त्यांच्यावरदेखील चिडताना दिसतो आहे.
सूरज सांगतोय त्याला मिळालेल्या गोलीगत धोक्याबद्दल
निक्की आणि घन:श्यामला आजच्या भागात सूरज त्याला मिळालेल्या गोलीगत धोक्याबद्दल सांगणार आहे. त्यावर निक्की विचारते,"तुला कोणी बुक्कीत टेंगुळ तर दिलं नाही ना?". सूरज म्हणतो,"माझ्यासोबत चांगली राहायची, बोलायची वगैरे... पण तिला दुसरा चांगला मुलगा मिळाला आणि तिने मला सोडले. गोलीगत धोका दिल्याने मला खूप राग आला होता. त्यानंतर मी लोकांच्या मनावर राज्य केलं".
कोण होणार घरातला नवीन कॅप्टन
काल A टीम आणि B टीममध्ये कॅप्टनसी टास्क रंगताना दिसतोय. आता या दोन टीमपैकी कॅप्टनसी टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण घराचा नवीन कॅप्टन होणार हे आज सर्वांना कळणार आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी हा शो पाहता येईल. तसेच जिओ सिनेमावरदेखील या कार्यक्रमाचे अपडेट्स पाहता येतील.