"माझा लय गावठी पॅटर्न हाय"; असं का म्हणाला गोलीगत सूरज चव्हाण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 13:57 IST2024-08-16T13:56:00+5:302024-08-16T13:57:02+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील रिल्स स्टार गोलीगत सूरज चव्हाणला प्रेक्षक आणि अनेक कलाकारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. सूरजला सुरुवातीला खेळ समजत नव्हता. पण आता त्याने खेळ समजून घेऊन मैदानात उडी मारली आहे.

"माझा लय गावठी पॅटर्न हाय"; असं का म्हणाला गोलीगत सूरज चव्हाण?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन जवळपास १९ दिवस उलटले आहेत. घरात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. एकीकडे काहींमध्ये चांगली गट्टी जमली आहे. तर निकी आणि अरबाजमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. तर घरातील सदस्यांमधील वाद-तंटे पाहायला मिळत आहेत. या घरातील सदस्य सतत चर्चेत येताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील रिल्स स्टार गोलीगत सूरज चव्हाण(Suraj Chavan)ला प्रेक्षक आणि अनेक कलाकारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. सूरजला सुरुवातीला खेळ समजत नव्हता. पण आता त्याने खेळ समजून घेऊन मैदानात उडी मारली आहे. "माझा लय गावठी पॅटर्न हाय", असे सूरज आज म्हणताना दिसणार आहे.
सूरज चव्हाणचा साधेपणा 'बिग बॉस' प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आजच्या भागात वर्षा ताई सूरजचं कौतुक करत त्याला सांगत आहेत,"खूप छान खेळलास". यावर सूरज म्हणतोय,"मला तो थांबवत होता तेव्हा खूप चीड येत होती...मी लय गावठी पॅटर्न हाय". सूरजचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
सदस्यांना मिळाली फळांची मेजवानी
'बिग बॉस मराठी'च्या घरातील ग्रुप B च्या सदस्यांना आज फळांची मेजवानी मिळणार आहे. ग्रुप B मधील सदस्य अनेकदा पिकनिकला आल्यासारखे गार्डन एरियामध्ये गप्पा मारताना दिसून येतात. आज त्यांना 'बिग बॉस'तर्फे खास फळं मिळणार आहेत.