"महाराष्ट्राचा मराठी मुलगा...", प्रणित मोरेला जान्हवी किल्लेकरचा फुल सपोर्ट, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:00 IST2025-12-05T17:56:52+5:302025-12-05T18:00:14+5:30
प्रणित मोरेला सपोर्ट करण्यासाठी जान्हवी किल्लेकर उतरली मैदानात, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

"महाराष्ट्राचा मराठी मुलगा...", प्रणित मोरेला जान्हवी किल्लेकरचा फुल सपोर्ट, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत म्हणाली...
Jahnvi Killekar Support To Pranit More For BB19 : 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पर्वाला यंदाचे टॉप ५ कन्टेस्टंट मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या शोची आणि त्यातील स्पर्धकांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच हा कार्यक्रम आता शेवटाकडे आला असून या पर्वाची ट्रॉफी कोण उंचावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. येत्य ७ डिसेंबरला बिग बॉस १९ चा ग्रॅंड फिनाले पार पडणार आहे.प्रेक्षकांच्या मतांवरुन ठरेल की, यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार. यादरम्यान अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत.
दरम्यान, बिग बॉस मराठी ५ ची स्पर्धक, अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जान्हवीने तिच्या व्हिडीओमधून प्रणित मोरेला पाठिंबा दर्शवला. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करत जान्हवीने त्यामध्ये म्हटलंय,"नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, हिंदी बिग बॉस १९ मध्ये आपल्या महाराष्ट्राचा मराठी मुलगा हा अंतिम फेरीत पोहोचला आहे. मल असं वाटतं की, प्रणितचं काम संपलं आहे आणि आपल्या सगळ्याचं काम सुरू झालं आहे त्याला त्या ट्रॅफिपर्यंत पोहोचवण्याचं.
प्रणितसाठी जान्हवी उतरली मैदानात...
पुढे ती म्हणते,"त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला मला आवर्जून सांगावसं वाटतंय आता हीच वेळ आहे आपल्या महाराष्ट्राची, मराठी माणसाची ताकद दाखवून देण्याची,आणि प्रणित मोरेला हिंदी बिग बॉस १९ च्या ट्रॉफिपर्यंत पोहोचवण्याची हीच वेळ आहे. तर सगळ्यांनी मिळून खूप सारं वोट करूया आणि प्रणित मोरेला,महाराष्ट्राच्या मराठी मुलाला हिंदी बिग बॉस १९ चा विनर करूया...",. सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. शिवाय प्रणितच्या चाहत्यांनी तिने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कौतुक केलं आहे.