'बिग बॉस'च्या घरात सूरज चव्हाण झाला भावुक; म्हणतो, "माझ्यासाठी गाव महत्वाचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:11 IST2024-09-13T11:07:22+5:302024-09-13T11:11:02+5:30

सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी'चा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाणचा भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. 

bigg boss marathi season 5 contestant suraj chavan got emotional by remembering his village video viral on social media  | 'बिग बॉस'च्या घरात सूरज चव्हाण झाला भावुक; म्हणतो, "माझ्यासाठी गाव महत्वाचा..."

'बिग बॉस'च्या घरात सूरज चव्हाण झाला भावुक; म्हणतो, "माझ्यासाठी गाव महत्वाचा..."

Suraj Chavan Video : सध्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, या पर्वाच्या सातव्या आठवड्यात स्पर्धक टास्क जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच 'बिग बॉस'च्या घरात सर्वाधिक चर्चा रंगलेली असते ती म्हणजे 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणची. आपल्या साध्या- भोळ्या स्वभावाने बारामतीच्या या पठ्ठ्याने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. नुकताच सोशल मीडियावर सूरज चव्हाणचा एक व्हायरल व्हिडीओ चर्चेत आला आहे. 


दरम्यान, सूरजने त्याच्या दमदार खेळीने 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात आपली छाप उमटवली आहे. इतकंच नाही तर सूरजला घराचा कॅप्टन होण्याचा मान देखील मिळाला. अशातच नुकताच 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये  'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाण गावच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये त्याच्यासोबत अंकिता आणि पॅडी कांबळे बसलेले दिसत आहेत. तेव्हा तो म्हणतो, "मला गाव महत्वाचं आहे. कधी मी माझं गाव बघतोय असं झालंय. त्यावर अंकिता प्रतिक्रिया देताना म्हणते, यातून आपल्या भावनांना आवर घालायचा आहे". 'बिग बॉस'च्या घरात राहून सूरजला गावची प्रचंड ओढ लागली आहे, असं कळतंय. 

पुढे सूरज म्हणतोय, "मी एकदम साधा मुलगा आहे. पण मला राग आला तर मग मी पुढे मागे पाहत नाही. त्यामुळे मी माझ्या मनावर ताबा ठेवला आहे".  त्यावर उत्तर देताना पॅडी कांबळे म्हणतो, तुझा ताबा मला चांगलाच माहिती आहे. तर अंकिता त्यांच समर्थन करत बोलते, हो, त्या दिवशी बघितलं आहे". हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सूरजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

सोशल मीडियावर सूरज चव्हाणची तगडी फॅन फॉलोइंग आहे. यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सूरज सहभागी झाल्यापासून तोच ट्रॉफी जिंकला पाहिजे असं त्याच्या चाहत्यांचं मत आहे. 

Web Title: bigg boss marathi season 5 contestant suraj chavan got emotional by remembering his village video viral on social media