'बिग बॉस मराठी' विजेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, कुलदेवतेचरणी ठेवली लग्नाची पत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:21 IST2025-05-03T12:13:39+5:302025-05-03T12:21:24+5:30

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर कायम चर्चेत असतो.

bigg boss marathi season 4 fame actor akshay kelkar get married soon shared special video | 'बिग बॉस मराठी' विजेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, कुलदेवतेचरणी ठेवली लग्नाची पत्रिका

'बिग बॉस मराठी' विजेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, कुलदेवतेचरणी ठेवली लग्नाची पत्रिका

Akshay Kelkar: 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर कायम चर्चेत असतो. अक्षय कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर की प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत येतो. गेल्या वर्षी अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड रमाबद्दल जाहीर प्रेमाची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. आता अक्षयच्या घरी लग्नाची लगबग झाली सुरू झाली आहे. अभिनेता अक्षय केळकर गायिका साधना काकतकरसोबत लवकरच लग्न करणार आहे. 

नुकताच अक्षय केळकरने त्याच्या युट्यूब अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने शुभकार्याची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करत असून पहिली पत्रिका कुलदेवतेसमोर ठेवत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खरेदीला सुरुवात झाली. आता या खरेदीनंतर अक्षय त्याच्या  कुटुंबासह गावी गेला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये असलेल्या कुलदेवता दालभेश्वराचे दर्शन घेऊन तिथे त्याने लग्नाची पत्रिका ठेवली आहे. त्यामुळे अक्षय केळकर आणि साधना काकतकर यांच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. साधना आणि अक्षयची खास जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय हे निश्चित आहे. 

वर्कफ्रंट

दरम्यान, अक्षय केळकर अनेक मालिका तसेच रिअॅलिटी शओमध्ये झळकला आहे. त्याने 'कलर्स मराठी' वाहिनीवर 'अबीर गुलाल' या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला. 

Web Title: bigg boss marathi season 4 fame actor akshay kelkar get married soon shared special video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.