"संग्रामची शक्ती खूप कमी पडली..." अरबाजच्या खेळाचं 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाकडून कौतुक; पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 16:26 IST2024-09-13T16:23:49+5:302024-09-13T16:26:36+5:30

Bigg Boss Marathi 5 : कायम वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या अरबाजच्या खेळीचं 'बिग बॉस'च्या एका माजी स्पर्धकाने तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय.

bigg boss marathi season 3 contestant trupti desai share post on social media in favour of season 5 contestant arbaz patel | "संग्रामची शक्ती खूप कमी पडली..." अरबाजच्या खेळाचं 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाकडून कौतुक; पोस्ट चर्चेत

"संग्रामची शक्ती खूप कमी पडली..." अरबाजच्या खेळाचं 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाकडून कौतुक; पोस्ट चर्चेत

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा शो म्हटला तर त्यातील राडे, भांडण तसेच वाद-विवाद या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना काही नव्या नाही. त्यातच यंदाचा 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. या शोप्रमाणे त्यातील काही स्पर्धकही प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहेत. शिवाय त्या स्पर्धकांच्या खेळीवर नेटकऱ्यांसह 'बिग बॉस'चे माजी स्पर्धक देखील व्यक्त होताना दिसतात. यंदाच्या सीझनमध्ये घरातील सर्वाधिक वादग्रस्त सदस्यांमध्ये काही मोजकीच नावे पुढे आहेत. त्यातील एक म्हणजे अरबाज पटेलचं आहे. दरम्यान, कायम वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या अरबाजच्या खेळीचं 'बिग बॉस'च्या एका माजी स्पर्धकाने तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातील सदस्य तृप्ती देसाई यांनी अरबाजच्या खेळीचं कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

दरम्यान, अलिकडेच झालेल्या कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये अरबाज आणि संग्राममध्ये कॉंटे की टक्कर झाली. या टास्कमध्ये कोण वरचढ ठरतंय हे पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक होते. अखेरीस अरबाजच्या टीम-ए ने मारली आणि तो टास्क जिंकला. अशातच तृप्ती देसाई यांनी अरबाज पटेलच्या शक्ती आणि युक्तीचा मेळ पाहून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलंय, "काहीही म्हणा आज अरबाज खरोखरच खूप चांगला खेळला. संग्रामची शक्ती खूप कमी पडली, अरबाजच्या युक्ती आणि खेळापुढे..." असं लिहीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सहाव्या आठवड्यात छोटा पुढारी घराबाहेर पडला. त्यानंतर घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. संग्रामने घरात आल्यावर अरबाजवर शाब्दिक वार केल्याचं पाहयला मिळालं. घरामध्ये आल्यानंतर संग्राम अरबाजकडे निशाणा साधत म्हणतो की, "तू आतापर्यंत तुझी maximum पॉवर दाखवली आहेस ती वीक माणसाला" अरबाजला हे पटत नाही. अशाप्रकारे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली.

Web Title: bigg boss marathi season 3 contestant trupti desai share post on social media in favour of season 5 contestant arbaz patel