Big Boss मराठी सिझन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर करणार सूत्रसंचालन 'हा' घ्या पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:22 IST2019-04-20T18:11:05+5:302019-04-20T18:22:40+5:30
बिग बॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी सीझननंतर, कलर्स मराठी आता घेऊन येत आहे बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा सीझन दुसरा.

Big Boss मराठी सिझन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर करणार सूत्रसंचालन 'हा' घ्या पुरावा
बिग बॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी सीझननंतर, कलर्स मराठी आता घेऊन येत आहे बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा सीझन दुसरा.
पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली असे आपल्या सगळ्यांचे आवडते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीझन 2 चे सूत्रसंचालन करणार आहेत. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना दिसले. महेश मांजरेकर या प्रोमोमध्ये राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसणार आहेत. आता हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच प्रेक्षकांना पडू शकतो कि, या वेळेस बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखादी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तर दिसणार नाही ना !
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सीझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे.
“बिग बॉस” हा कार्यक्रम भारतातील सगळ्यात उत्कंठावर्धक कार्यक्रम आहे ज्याची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने बघत असतात, जो अनेक प्रादेशिक भाषा म्हणजेच हिंदी, मराठी, कन्नड आणि तमिळ मध्ये देखील लोकप्रिय आहे. हिंदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपरस्टार सलमान खान करतो.