बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याने मोबाईल चोरट्याला घडवली होती अशी अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 17:07 IST2019-07-19T16:56:36+5:302019-07-19T17:07:02+5:30
हल्ली साखळीचोर, खिसेकापू आणि मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. रस्त्यावरून चालताना असो वा गाडीतून प्रवास करताना असो, आपल्या सामानाची काळजी घेणं आणि त्याहून आधिक सतर्क राहणं गरजेचं झालं आहे

बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याने मोबाईल चोरट्याला घडवली होती अशी अद्दल
हल्ली साखळीचोर, खिसेकापू आणि मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. रस्त्यावरून चालताना असो वा गाडीतून प्रवास करताना असो, आपल्या सामानाची काळजी घेणं आणि त्याहून आधिक सतर्क राहणं गरजेचं झालं आहे. बिग बॉस मराठी सीजन २ ची स्पर्धक नेहा शितोळेने तिच्यासोबत घडलेला असाच एक किस्सा नुकताच शेअर केला. रात्रीच्या प्रहरी सिनेमा बघितल्यानंतर नेहा टॅक्सीतून घरी जात होती. तेव्हा, सिग्नलवर गाडी थांबली असताना, नेमका सिग्नल सुटायच्या वेळेत खिडकीतून हात टाकत मोबाईल लंपास करण्याचा प्रयत्न चोराने केला. नेहाने प्रसंगावधान दाखवत त्याचा हात धरला, आणि टॅक्सी ड्रायवरला गाडी चालू करत पुढच्या चौकात नेहण्यास सांगितले.
तोपर्यंत तिने त्या चोराचा हात घट्ट पकडून ठेवला होता. टॅक्सी थांबविल्यानंतर मग नेहाने त्याला भर रस्त्यात चांगलेच चोपले. ईतक्या कष्टाने आणि मेहनतीने विकत घेतलेला मोबाईल, ही नाणसं एका सेकंदामध्ये कसे काय चोरून पळू शकतात! याचा तिला प्रचंड राग आला होता, आणि त्यामुळे तिने त्या चोराला चांगलीच अद्दल घडवली. पुढे त्या चोराला तिच्या हातून सुटत पळून जाण्यात यश तर आलेच, परंतू तोपर्यंत आपल्या धाकड गर्लच्या फटक्यांनी त्याला त्याचे सात जन्म आठवले!