थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अवतार, बिकिनीत बोल्ड झाली अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:35 IST2025-12-10T12:34:39+5:302025-12-10T12:35:07+5:30
थायलंडमध्ये ट्रिप एन्जॉय करतेय जान्हवी किल्लेकर, बिकिनीत दाखवला हॉट लूक

थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अवतार, बिकिनीत बोल्ड झाली अभिनेत्री
'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकर कायमच चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. चाहत्यांना ती नेहमीच तिचे पर्सनल लाइफ आणि करिअरमधील अपडेट्स देत असते. सध्या जान्हवी थायलंडला गेली आहे. तिथल्या बीचवर जान्हवी एन्जॉय करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.
जान्हवी कामानिमित्त थायलंडला गेली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत अभिनेत्री बीचवर मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. जान्हवीने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला तिने “Thai tides & good vibes", असं कॅप्शन दिलं आहे. तर व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने बोटीत बसून फोटोसाठी खास पोझही दिल्याचं दिसत आहे. जान्हवीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
जान्हवी ही मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. पण, जान्हवीला खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांनी जास्त पसंत केलं. 'जय जय स्वामी समर्थ', 'आई माझी काळुबाई', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'भाग्य दिले तू मला' या मालिकांमध्ये ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी ५'मुळे जान्हवी प्रसिद्धीझोतात आली होती.