'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकली 'बिग बॉस मराठी' फेम अमृता देशमुख, व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:33 IST2025-05-31T10:31:32+5:302025-05-31T10:33:28+5:30
बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम अमृता देशमुख (Amruta Deshmukh)ला 'एक नंबर, तुझी कंबर...' या गाण्याने भुरळ घातली असून तिने या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकली 'बिग बॉस मराठी' फेम अमृता देशमुख, व्हिडीओ चर्चेत
प्रसिद्ध गायक संजू राठोड(Sanju Rathod)चे लेटेस्ट गाणं 'एक नंबर, तुझी कंबर...' (Ek Number, Tuzi Kambar Song) हे सध्या चांगलंच गाजताना दिसत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांसोबत अनेक कलाकारांनी या गाण्यावर रिल बनवले आहेत. दरम्यान आता 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम अमृता देशमुख (Amruta Deshmukh) हिलाही या गाण्याने भुरळ घातली असून तिने या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती 'एक नंबर, तुझी कंबर...' या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. यावेळी तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
वर्कफ्रंट
अमृता देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने 'फ्रेशर्स', 'मी तुझीच रे', 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेत काम केले आहे. अमृता 'स्वीटी सातारकर' या सिनेमातही झळकली आहे. तिने 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये अमृताची अभिनेता प्रसाद जवादेसोबत मैत्री झाली. त्यानंतर प्रसाद - अमृताने या दोघांनी खऱ्या आयुष्यात एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. सध्या ती लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने तब्बल ५ वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन केले. शेवटची ती सोनी मराठीवरील 'मी तुझीच रे' मालिकेत काम करताना दिसली होती.