BBM6: "बार डान्सर करतात ते तुम्ही स्टेजवर घेऊन येता..."; दीपाली सय्यदने राधा पाटीलला 'लावणी'वरुन सुनावलं, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:16 IST2026-01-13T12:14:53+5:302026-01-13T12:16:26+5:30
Bigg Boss Marathi 6 Episode 2 Promo: दीपाली सय्यद आणि राधा पाटीलमध्ये बिग बॉसच्या घरात मतभेद पाहायला मिळाले. लावणीवरुन दीपालीने राधाची चांगलीच शाळा घेतली

BBM6: "बार डान्सर करतात ते तुम्ही स्टेजवर घेऊन येता..."; दीपाली सय्यदने राधा पाटीलला 'लावणी'वरुन सुनावलं, काय म्हणाली?
'बिग बॉस मराठी ६' ला सुरुवात झाली आहे. स्पर्धकांमधले मतभेद आता सर्वांसमोर येत आहेत. अशातच 'बिग बॉस मराठी ६'चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोत दिपाली सय्यदने घरात सहभागी झालेल्या लावणी डान्सर राधा पाटीलला चांगलंच सुनावलं आहे. त्यामुळे राधाचं मन दुखावलं गेल्याचं दिसतंय. राधा आणि दिपाली यांच्यात नेमका कशामुळे वाद झाला? जाणून घ्या.
दिपालीने राधाची लावणीवरुन घेतली शाळा
'बिग बॉस मराठी ६'च्या नवीन प्रोमोत दिसतंय की, दिपाली सय्यद डायनिंग टेबलवर बसलेल्या असते. ती राधाला उद्देशून सांगते, ''लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतात. बार डान्सर जे करतात तेच तुम्ही स्टेजवर घेऊन येता.'' राधा दिपालीचं म्हणणं ऐकून घेते. पुढे राधा गार्डन एरियात कोणाशीतरी बोलताना दिसते. ती म्हणते, ''दिपालीताई लावणीबद्दल जे बोलत आहेत ना. मी पण लायकी काढू शकते ना मग. ती जर का डान्स करत होती, डान्समध्ये तिचं थोडीच नाव आहे.'', अशा शब्दात राधाने दिपालीबद्दलचा राग काढला.
अशाप्रकारे 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील दिपाली आणि राधा पाटील यांच्यातील मतभेद दिसून आले. आता या मतभेदाला आणखी कसं वेगळं रुप मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनेकांनी हा प्रोमो पाहून दिपाली यांचं समर्थन केलं आहे. तर काहींनी हा प्रोमो पाहून राधा पाटीलला सपोर्ट केला आहे. राधा जेव्हा घरात आली होती तेव्हा तिने सबसे कातील अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी पाटीलशीही चांगलाच पंगा घेतला होता.